Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँगे्रसचा नवा प्रयोग !

महाराष्ट्र काँगे्रसच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची निवड काँगे्रसच्या नेतृत्वाने केली आहे. खरंतर ही निवड अनपेक्षित अशी आहे. तशीच पक्षा

शरद पवारांची राजकीय चाल
विधिमंडळाच्या संस्कृतीला न शोभणारे वर्तन
दुष्काळाच्या झळा आणि पाणीटंचाई

महाराष्ट्र काँगे्रसच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची निवड काँगे्रसच्या नेतृत्वाने केली आहे. खरंतर ही निवड अनपेक्षित अशी आहे. तशीच पक्षातील मातब्बर नेत्यांना धक्का देणारी आहे. त्याचप्रमाणे पक्षाची पाळेमुळे घट्ट करण्यासाठी एक आश्‍वासक चेहरा काँगे्रसने दिला आहे. वास्तविक पाहता नाना पटोले यांच्याकडे पक्षाने नेतृत्व सोपवल्यानंतर एक आक्रमक चेहरा म्हणून पटोलेकडे पाहिले जात होते, लोकसभेत अपेक्षित यश मिळाले असले तरी, विधानसभेत पक्षाला चांगले यश मिळाले नाही, त्याशिवाय पक्षसंघटनेत नाना पटोले यांच्याविषयी प्रचंड नाराजी होती. तसेच विधानसभा निवडणुकीनंतर पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यात पक्षसंघटन वाढवण्यासाठी पक्षाकडून नव्या चेहर्‍याचा शोध घेतला जात होता. अशावेळी अमित देशमुख, डॉ. नितीन राऊत, विश्‍वजीत कदम यासारखे अनेक नेते प्रदेशाध्यक्षपदासाठी उत्सुक होते. मात्र काँगे्रसने तळागाळातून आलेल्या हर्षवर्धन जाधव यांना काँगे्रसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करून एक सुखद धक्का दिला. खरंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी काँगे्रसच्या विद्यार्थी संघटनेपासून पक्षात काम करण्यास सुरूवात केली. सरपंच पदापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात केली. 1999 मध्ये सपकाळ यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. या कालावधीत महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आहे. 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर बुलढाणा विधानसभा मतदारसंघ निवडणूक जिंकली आणि विधानसभेत प्रवेश केला. मात्र यापलीकडे त्यांची राजकीय कारकीर्द फुलली नाही. मात्र त्यांचे पाय सातत्याने जमीनीवरच राहिले असून, त्यांनी पक्षाच्या संघटनेवर जास्तीत जास्त भर दिला. शिवाय त्यांची वैचारिक अभ्यास असल्यामुळे त्यांची निवड एका अर्थाने सार्थ ठरते. सपकाळ यांच्यावर संत गाडगेमहाराज, तुकडोेी महाराज, महात्मा गांधी, विनोबा भावे या गांधींवादी विचारसरणीचा मोठा प्रभाव आहे. ते सध्या काँगे्रसशी संबंधित राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. असे असतांना एका वैचारिक आणि तत्वनिष्ठ कार्यकर्त्याला काँगे्रसने प्रदेशाध्यक्ष पदाची संधी दिली आहे, त्यामागे अनेक कारणे आहे. शिवाय काँगे्रस चाकोरीसोडून पक्षाचा विचार करतांना दिसून येत आहे. कारण काँगे्रस पक्षाचा पराभव होण्याचे प्रमुख कारण म्हणजे पक्षात असलेली सरंजामदारशाही. पक्षापेक्षा अनेक नेते स्वतःला मोठे समजत होते, आणि त्यांनी व्यक्तीगत हितासाठी पक्षाला आपल्या सोयीचे निर्णय घेणे भाग पाडले. त्यामुळे जिल्हा-जिल्ह्यात मातब्बर नव्हे तर सरंजामदार नेतृत्व काँगे्रसने तयार केले. पक्षाची सत्ता जाताच या नेतेमंडळीनी भाजपात जाणे पसंद केले. परिणामी काँगे्रसची शकले उडाली, त्यामुळे अनेक नेते काँगे्रसला सोडून गेली. म्हणजेच पक्षाच्या वाईट परिस्थितीत मोजकेच नेते पक्षासोबत राहिले, त्यामुळे काँगे्रसने तळागाळातील नवे नेेतृत्व तयार करण्याची गरज होती, मुख्यमंत्रीपद मातब्बर नेत्याला, त्यासाठी काँगे्रसने कधीही सर्वसामान्य चेहर्‍याचा विचार केला नाही, आमदार-खासदार, मंत्रीपदासाठी सर्वसामान्य चेहर्‍याला संधी देणे काँगे्रस जणू काही विसरली होती. मात्र हर्षवर्धन सपकाळ सारख्या तळागाळातील नव्या चेहर्‍याला संधी देवून काँगे्रसने जणू काही नवा बदल आम्ही स्वीकारत असल्याचा संदेशच दिला आहे. सपकाळ यांना प्रदेशाध्यक्षपद मिळाले असले तरी, त्यांच्यासमोर नवे आव्हाने आहेत. पक्ष संघटनेत महत्वपूर्ण बदल करणे, काँगे्रसच्या संघटनेचे नूतनीकरण करणे, मुख्य म्हणजे कार्यकर्त्यांना कार्यक्रम देणे. काँगे्रस नेतृत्वाकडून आपल्या कार्यकर्त्यांना कोणताही कार्यक्रम न देण्यात आल्यामुळे पक्ष संघटनेत कोणतेही नवचैतन्य नव्हते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येवू घातल्या आहेत, अशावेळी कार्यकर्त्यांना कार्यक्रम देवून त्यांना सक्रिय बनवणे, त्यांना कार्यक्रम देणे, पक्षसंघटना बळकट करणे अशी अनेक कामे सपकाळ यांना करावी लागणार आहे. त्याचबरोबर मातब्बर नेत्यांबरोबर जुळवून घेणे, अंतर्गत कलह रोखणे, अशी अनेक आव्हानात्मक कामे सकपाळ यांच्यासमोर उभी आहेत. राज्यात पक्षाला सत्तेत वाटा मिळण्याची चिन्हे नाहीत, कारण पुढील पाच वर्षे राज्यात महायुतीचे सरकार असणार आहे, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्षाला नवचैतन्य देण्याचे महत्वाचे काम त्यांच्यासमोर असणार आहे.

COMMENTS