सातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी वृद्धापकाळाने भुईंज (ता. वाई) येथील निवासस्थानी रविवारी पहाटे निध

सातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी वृद्धापकाळाने भुईंज (ता. वाई) येथील निवासस्थानी रविवारी पहाटे निधन झाले. भुईंज गावचे सरपंच म्हणून राजकीय कारकिर्दीला प्रारंभ करणार्या प्रतापराव भोसले यांनी 4 वेळा आमदार म्हणून वाई खंडाळा विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करताना कॅबिनेट मंत्री म्हणून यशस्वी काम केले. त्यानंतर ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या निधनाने रिक्त झालेल्या सातारा लोकसभा मतदार संघातून 3 वेळा संसदेत खासदार म्हणून प्रतिनिधीत्व केले.
COMMENTS