Homeताज्या बातम्यादेश

काँग्रेस नेते पवन खेरांना जामीन मंजूर

विमानातून उतरवून पोलिसांनी केली होती अटक

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः काँग्रेस नेते पवन खेरा गुरुवारी सकाळी पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर खेरा यांनी या अटकेविरोधात सर्वोच्च न्याया

अकोल्यात औषध फवारणी करावी
सरकार पाडण्याचे उदात्तीकरण म्हणजे………! 
कृत्रिम व फेक पनीर विक्री विरोधात कडक कारवाई करणार; उपमुख्यमंत्री पवार

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः काँग्रेस नेते पवन खेरा गुरुवारी सकाळी पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर खेरा यांनी या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी पार पडली. त्यात न्यायालयाने खेरा यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
काँग्रेसचे रायपुरमधील अधिवेशन काही तासांवर येऊन ठेपलेले असतानाच आता पक्षाला एक मोठा धक्का बसला आहे. कारण आता काँग्रेस नेते पवन खेरा यांना दिल्ली विमानतळावरून पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. आसाम पोलिसांच्या विनंतीनंतर दिल्ली पोलिसांनी पवन खेरा यांच्यावर कारवाई केली असून त्यानंतर काँग्रेसने या प्रकरणाविरोधात तातडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यानंतर गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर पवन खेरा यांच्या जामीनासाठी सुनावणी पार पडणार आहे. खेरा यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्ली विमानतळ परिसरात आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे आता पवन खेरा यांच्या अटकेनंतर दिल्लीत मोठे राजकीय वादंग पेटले आहे. हिंडेनबर्गने अदानी समुहावर आरोप केल्यानंतर काँग्रेस नेते पवन खेरा यांनी एक पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली होती, त्यात त्यांनी म्हटले होते की, ’वाजपेयींनी संयुक्त संसदीय समिती बनवली होती मग नरेंद्र गौतम दास मोदी यांना समिती स्थापन करण्यात काय अडचण आहे?’, असा सवाल पवन खेरा यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर आसाम पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत अटक करण्याची कार्यवाही सुरू केली होती. आसाम पोलिसांनी विनंती केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी खेरा यांना विमानतळावरच ताब्यात घेतले आहे.

COMMENTS