Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नेवासेत काँग्रेस जनसंवाद यात्रेचा प्रारंभ

जिल्ह्यातील प्रत्येक गावात काँग्रेसतर्फे यात्रेचे आयोजन

नेवासा/प्रतिनिधी ः काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी देशाची एकात्मता व लोकशाही टिकविण्यासाठी काढलेल्या भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्ती

चाळीस हजार वृक्षरोपे वाटणारे पर्यावरण मित्र संदीप मालुंजकर
कॉ. बाबा आरगडे गौरव ग्रंथ प्रकाशित करणार
वंचितच्या माध्यमातून बहुजनांना न्याय देणार ः निलेश गायकवाड                                    

नेवासा/प्रतिनिधी ः काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी देशाची एकात्मता व लोकशाही टिकविण्यासाठी काढलेल्या भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्ती निमीत्त देशभरात काँग्रेस जनसंवाद यात्रा काढण्यात येत आहे. अहमदनगर जिल्ह्यात ऐतिहासिक  भुईकोट किल्ला याठिकाणी राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. तर रविवारी,दि.10 सप्टेंबर रोजी नेवासा तालुका काँग्रेस कमिटीकडून खीलेश्‍वर गणपतीचे दर्शन घेऊन नेवासा काँग्रेसने जनसंवाद यात्रेस प्रारंभ केला. नेवासा तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष संभाजी माळवदे शहराध्यक्ष अंजुम पटेल, जिल्हा काँग्रेसचे अनु.जाती सेलचे अध्यक्ष राजेंद्र वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील प्रत्येक गावात पायी प्रवास करत ही जनसंवाद यात्रा काढण्यात येणार आहे.
 रविवारी नेवासा तालुक्यात जनसंवाद यात्रेस प्रारंभ करण्यात आला. जनसंवाद यात्रेद्वारे भाजप सरकारचा भ्रष्ट कारभार, महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्‍न, व अन्य मुद्द्यावर आवाज उठविला जाणार आहे. ही जनसंवाद यात्रा तालुक्यातील प्रत्येक गावात पायी प्रवास करत जावून नागरिकांसोबत संवाद साधला जाणार आहे. त्यांच्या भावना व समस्या समजून घेण्यात येणार आहे.तसेच केंद्र सरकारने लादलेली महागाई, बेरोजगारी अशा अनेक प्रश्‍नाबाबत नागरिकांमध्ये जागृती अभियान राबविण्यात येणार आहे. यावेळी नेवासा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी माळवदे यांनी सांगितले की, नेवासा तालुक्यातील सर्वच गावात, सर्व घराघरात काँग्रेसचे विचार यानिमित्ताने पोहचविले जाणार आहे. केंद्रातील मोदी सरकारचा खोट्या आश्‍वासनांचा बुरखा फाडला जाणार आहे. तसेच तालुक्यातील प्रत्येक नागरिकांच्या समस्या समजून घेवून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल. तर शहराध्यक्ष अंजुम पटेल यांनी स्वातंत्र्याच्या पहिल्या लढाई नंतर आता ही दुसरी स्वातंत्र्याची लढाई लढण्याची वेळ आलेली आहे. ही लढाई जिंकलो तर लोकशाही व संविधान टिकेल. यात्रेच्या माध्यमातून जनजागृती करून ही लढाई जिंकणार  आहे. तर महिला काँग्रेसच्या शोभा पातारे यांनी महिला सुरक्षेच्या दृष्टीने भाजप सरकार पुर्णपणे अपयशी ठरले असून, मणिपूर मधील घटना बघता या सरकारला आता सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. यात्रेतून तालुक्यातील महिलांच्या समस्या समजून घेवून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल.यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्‍वर मुरकुटे,काँग्रेस परिवहन विभाग जिल्हाध्यक्ष संदीप मोटे, प्रदेशचे चंद्रशेखर कडू,सोशल मीडियाचे सचिन बोर्डे,नेवासा काँग्रेसचे सतिष तर्‍हाळ, संजय होडगर, गोरक्षनाथ काळे, एनएसयुआईचे इलियास शेख, द्वारक जाधव, नंदु कांबळे,अशोक बनसोडे,महीला काँग्रेसच्या ज्योती भोसले, अर्चना बर्डे, संगीता चांदणे, मिरा वडागळे, युवक काँग्रेसचे आकाश धनवटे, सद्दाम शेख, इम्रान पटेल, इम्रान जहागीरदार, आलम पिंजारी, शरीफ शेख, अल्ताफ शेख, आदीसह नागरिक व काँग्रेसप्रेमी उपस्थित होते.
-प्रतिक्रिया ः देशांतील लोकशाही टिकविण्यासाठी संविधान टिकविण्यासाठी द्वेष व जातीय तणावाच्या वातावरणात प्रेम आणि मानवतेचा संदेश या जनसंवाद पद यात्रेतून देण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्वांनी या जनसंवाद यात्रेत सहभागी व्हावे.- राजेंद्र वाघमारे,अध्यक्ष, अनु.जाती सेल.

COMMENTS