Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गॅस दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक

रस्त्यावर चुलीवर भाकरी थापून केला केंद्र सरकारचा निषेध

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी ः घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 50 रुपयांनी वाढल्यामुळे गॅससाठी 1100 रुपयांपेक्षा अधिक पैसे मोजावे लागत असल्यामुळे काँगे

शेकापचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचे निधन
लाडकी बहीण योजनेत भावांची घुसखोरी
छत्रपती संभाजीनगर मध्ये 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी ः घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 50 रुपयांनी वाढल्यामुळे गॅससाठी 1100 रुपयांपेक्षा अधिक पैसे मोजावे लागत असल्यामुळे काँगे्रसने आक्रमक पवित्रा घेतला असून, गुरुवारी राज्यभर आंदोलन करण्यात आले. छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्त्यावर चूल मांडून. त्यावर भाकरी थापून आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी गॅसच्या टाक्या वाजवून यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच ’कहा गये भाई कहा गये अच्छे दिन कहा गये, वा रे मोदी तेरा खेल सस्ती दारू महंगा तेल’ अशी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
केंद्र सरकारने केलेल्या गॅस दरवाढीला काँग्रेसकडून जोरदार विरोध करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये दीड तास आंदोलन करण्यात आले. भाजपच्या या निर्णयामुळे सामान्यांना जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे या विरोधात हे आंदोलन छेडल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे शहर अध्यक्ष युसूफ शेख यांनी दिली. ’हुकूमशाही नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, जनता के सन्मान मे काँग्रेस मैदान मे,’ ’या सरकारचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय’ अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.

COMMENTS