Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विरोधी पक्षनेते पदावर काँगे्रसचा दावा

संख्याबळानुसार पद आम्हालाच मिळेल ः बाळासाहेब थोरात

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते अजित पवार यांनी आपल्या सहकार्‍यांसह भाजपला पाठिंबा देत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्य

तालुक्याच्या सर्वांगीण विकास वाटचालीत भक्कम उभे राहा – आमदार थोरात
कॅन्सर रुग्णांच्या सेवेसाठी टाटा-एसएमबीटी हॉस्पिटल एकत्र – महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात
संगमनेरची शांतता बिघडवणार्‍यांना यशस्वी होऊ देऊ नका

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते अजित पवार यांनी आपल्या सहकार्‍यांसह भाजपला पाठिंबा देत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँगे्रसने तात्काळ राज्यात विधानसभेचा विरोधीपक्ष नेता म्हणून जितेंद्र आव्हाडांची नेमणूक केली आहे. मात्र काँगे्रसने या पदावर दावा केला आहे. जर अजित पवारांना 40 आमदारांचा पाठिंबा असेल तर, आता राष्ट्रवादीकडे केवळ 13 आमदार उरतात, त्यामुळे संख्याबळानुसार विरोधी पक्षनेते पद काँगे्रसकडे यायला हवे, असा दावा काँगे्रस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
अजित पवारांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना-भाजप सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या घटनाक्रमानंतर राष्ट्रवादीने त्यांच्या जागी आमदार जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केली आहे. या घडामोडींमुळे महाविकास आघाडीतही अस्वस्थता पसरली आहे. अजित पवार यांनी आपल्यासोबत 40 आमदार असल्याचा दावा केला आहे. हा दावा खरा निघाला तर शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केवळ 13 आमदार राहतील. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद कुणाला मविआतील कोणत्या पक्षाला मिळणार, यावरुन चर्चा रंगली आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी या प्रकरणी काँग्रेसलाच हे पद मिळेल, असा दावा केला आहे. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीने जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केली आहे. मात्र, काँग्रेसने त्यावर आक्षेप घेत सर्वाधिक आमदार असणार्‍या पक्षाचा आमदार विरोधीपक्ष नेता होईल, असा दावा केला आहे. काँग्रेस नेत्यांच्या आगामी बैठकीत या मुद्यावर सखोल चर्चा होईल, असेही ते म्हणालेत. महाविकास आघाडी अबाधित राहील. या प्रकरणी आमचे शरद पवारांशी बोलणे झाले नाही. सध्या ते कराडच्या दौर्‍यावर आहेत. आमची वज्रमुठ अधिक मजबुती होईल. सध्याच्या घटनाक्रमानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी पक्षनेता ठरवता येणार नाही. ते केवळ गटनेता ठरवू शकतात. सद्यस्थितीत काँग्रेसच्या आमदारांचा आकडा जास्त आहे. त्यामुळे साहजिकच आमचाच विरोधी पक्षनेता होईल, असेही बाळासाहेब थोरात याविषयी म्हणाले. महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणामध्ये 2 जुलै रोजी पुन्हा एकदा उलथापालथ झाली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांची दुसर्‍यांदा साथ सोडून 8 ज्येष्ठ आमदारांसह भाजप-शिवसेना (शिंदे गट) सरकारमध्ये सहभागी झाले. अवघ्या एका तासात हे सर्व घडले. अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांना मंत्री करण्यात एनडीएने जेवढा वेग दाखवला, तेवढ्याच वेगाने अजित पवार राष्ट्रवादीपासून वेगळे झाले. दुपारी 2 च्या सुमारास अजित पवार 8 आमदारांसह राजभवनात पोहोचले. दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सर्वांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. भाजपच्या गोटातील सूत्रांनी सांगितल्यानुसार, अजित पवार यांचा सरकारमध्ये समावेश करण्याचा निर्णय 2 दिवसांपूर्वीच घेण्यात आला होता. त्याची सुरुवात 28 जून रोजी झाली. दिल्लीत राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची बैठक झाली. व्यासपीठावरील पोस्टर्समध्ये शरद पवार यांच्यासह कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल यांचा समावेश होता. अजित पवारांना पोस्टरमध्ये स्थान मिळाले नाही.

COMMENTS