Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महागाईसह इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक; माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांसह बैलगाडी चालवून निषेध

कराड / प्रतिनिधी : पेट्रोल, डिझेल, गॅस यांचे वाढते भाव आणि त्यातच कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांची ढासळत चाललेली आर्थिक स्थिती या

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची जिल्हा माहिती कार्यालयाकडून गावोगावी प्रसिध्दी
शिवाजी विद्यापीठाचा जिल्हास्तरीय उद्या युवा महोत्सव
कोल्हापूर बसस्थानकात शिवशाही बसचा ब्रेक निकामी

कराड / प्रतिनिधी : पेट्रोल, डिझेल, गॅस यांचे वाढते भाव आणि त्यातच कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांची ढासळत चाललेली आर्थिक स्थिती यामुळे कराड तालुका काँग्रेस आक्रमक झालेली आज दिसून आली. येथील काँग्रेस कार्यकर्त्यांसह नेत्यांनी आज कराड शहरातून पदयात्रा काढली. यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी रॅलीत सहभागी होत बैलगाडी चालवून इंधन दरवाढीचा निषेध व्यक्त केला.
यावेळी त्यांच्यासोबत सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण, सहप्रभारी निखिल कवीश्‍वर, प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी अजितराव पाटील, कराड दक्षिण काँग्रेस अध्यक्ष मनोहर शिंदे, मलकापूर नगरीच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, माजी जि. प. सदस्या विद्याताई थोरवडे, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र माने, नगरसेवक डॉ. इंद्रजीत गुजर, इंद्रजीत चव्हाण, नरेंद्र पाटील, नितीन थोरात, शिवाजी मोहिते, नानासो पाटील, जि. प. चे माजी विरोधी पक्षनेते जयवंतराव जगताप, राजेंद्र चव्हाण, जि. प. सदस्य निवासराव थोरात, शंकरराव खबाले, मंगल गलांडे, राजेंद्र यादव, धनश्री महाडिक आदींसह काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. मोदी सरकारच्या काळात एक नव्हे तर तब्बल 69 वेळा पेट्रोल डिझेलचे भाव वाढले आहेत. मोदी सरकारने केलेल्या भाववाढीचा काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज निषेध नोंदवला.
माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, देशातील भाजप सरकारने जनतेची अवस्था केविलवाणी करुन टाकली आहे. ’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या सात वर्षांत देशातील गोरगरीब जनतेकडून इंधन दरवाढीच्या नावाखाली 23 लाख कोटींची वसुली केली. ही एक प्रकारे जनतेची लूटच आहे. मोदी सरकारच्या कार्यपध्दतीवर लोक नाराज असून त्यांच्या विरोधात लोक बोलत आहेत. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल आल्यानंतर मोदी सरकार पॅनिक झाले. यानंतर इंधन दरवाढ थोडी कमी केली आणि दुसरीकडे 30 नोव्हेंबरपासून प्रधानमंत्री गरीब कल्यान योजना बंद केली. गोरगरीब जनतेला महिनाकाठी मिळणारे रेशनवरील धान्य बंद करुन जनतेची फसवणुक केली आहे.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, भारतात मोठ्या प्रमाणात लसीकरण झाला असल्याचा दावा मोदींनी केला असलातरी जगात आपला क्रमांक 144 वा आहे. याचाच अर्थ भारताच्यापुढे अजून 143 राष्ट्र आहेत. ही बाब सरकार आणि त्यांच्या समर्थकांनी लक्षात घ्यायला हवी. महाराष्ट्रात विरोधकांनी सरकार पाडण्यासाठी आवश्यक असणारे शक्य तितके प्रयत्न केले. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. तीन पक्षाच्या सरकारला दोन महिने झाले की पडेल, वर्षांनंतर पडेल, आज पडेल, उद्या पडेल अशी वल्गना, भाकित भाजपकडून केले जात होते. आता त्यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचा नाद सोडून दिला आहे. कारण सरकार पाच वर्षे पूर्ण करणार आहे यात कोणतीही शंका नाही. इंधन दरवाढीवरून केंद्रातील मोदी सरकार राजकारण करत असून यातून सामान्य जनतेला वेठीस धरण्याचे काम चालू आहे. यासाठी सर्वसामान्य जनतेचा आवाज बनण्याचे काम काँग्रेस करत असून देशभर आंदोलने करून जनतेचा महागाई विरोधात आक्रोश मांडत आहे.

COMMENTS