Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विस्तारा फ्लाइटमध्ये मद्यधुंद प्रवासी महिलेचा गोंधळ

केबिन क्रू सोबत हाणामारी

मुंबई : विमान प्रवासासंदर्भातल्या अनेक घटना सध्या एकामागून एक चर्चेत आहेत. त्यात सोमवारी (30 जानेवारी) आणखी एका घटनेची भर पडली आहे. अबूधाबीवरू

सक्ती नाही, पण मास्क वापरा : राज्य सरकारचं आवाहन | DAINIK LOKMNTHAN
झोपण्याच्या वादातून एकाचा डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून केला खूनhttps://youtu.be/bWLekdpRZ68
शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचा परीक्षा कामांवर बहिष्कार

मुंबई : विमान प्रवासासंदर्भातल्या अनेक घटना सध्या एकामागून एक चर्चेत आहेत. त्यात सोमवारी (30 जानेवारी) आणखी एका घटनेची भर पडली आहे. अबूधाबीवरून मुंबईला येणाऱ्या एका इटालियन प्रवासी महिलेने स्वतःकडे इकॉनॉमी क्लासचं तिकीट असतानाही बिझनेस क्लासमध्ये बसण्याचा आग्रह धरला आणि केबिन क्रूने तिला विरोध केल्यावर तिने हल्ला केला आणि काही कपडे काढून अर्धनग्नावस्थेत ती विमानाच्या सीट्सच्या मधल्या जागेतून फिरली. पाओला पेरुशिओ नावाच्या 45 वर्षं वयाच्या महिलेने घातलेल्या या गोंधळामुळे प्राथमिक चौकशीनंतर मुंबईतल्या सहार पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी सोमवारी दुपारी तिच्याविरुद्ध केस दाखल करून तिला अटक केली. तिच्या पासपोर्टवरच्या माहितीनुसार, इटलीतल्या साँड्रिओ इथे तिचा जन्म झालेला आहे. ‘एअर विस्तारा’च्या यूके 256 या फ्लाइटमध्ये ही घटना घडली. त्या विमानाने भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी मध्यरात्री दोन वाजून तीन मिनिटांनी अबूधाबीवरून उड्डाण केलं आणि ते पहाटे 4.53 वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं. यादरम्यानच्या काळात ही घटना घडली.

COMMENTS