Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री साई सच्चरित्र पारायण सोहळ्याची सांगता

सोहळ्याला प.पु रमेशगिरीजी महाराज व मा.आ. स्नेहलता कोल्हे यांची उपस्थिती

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव येथील मुंबादेवी तरुण मंडळ व सुवर्णकार मित्र मंडळाच्या वतीने गेल्या 17 वर्षापासून श्री साई सच्चरित्र पारायण सोहळ्याचे

पिसाळलेल्या कुञ्याने चाव्यानेे आठ गायींसह शेळीचा मृत्यू
छ. संभाजीराजांचे शौर्य शत्रुला धडकी भरवणारे
कर्जतमधील अंबालिका शुगरवर आयकर विभागाचा छापा

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव येथील मुंबादेवी तरुण मंडळ व सुवर्णकार मित्र मंडळाच्या वतीने गेल्या 17 वर्षापासून श्री साई सच्चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन मोठ्या जल्लोषात करण्यात येत असते. याही वर्षी मंडळाच्या वतीने आयोजित पारायण सोहळ्याची सांगता गुरुवार दि.24 ऑगस्ट रोजी श्री संत सद्गुरू जनार्दन स्वामी समाधी स्थान बेट कोपरगावचे मठाधिपती प.पु.रमेशगिरीजी महाराज व कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

मुंबादेवी तरुण मंडळ व सुवर्णकार मित्रमंडळाच्या वतीने तसेच माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल व युवा नेते विक्रमादित्य संजय सातभाई यांच्या विशेष सहकार्याने सालाबाद प्रमाणे याही वर्षी गुरुवार दिनांक 17 ऑगस्ट पासून कोपरगाव शहरातील श्री संत नरहरी विठ्ठल मंदिर सराफ बाजारात श्री साई सच्चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यंदा 18 व्या पारायण सोहळ्याची सांगता गुरुवारी, दि. 24 ऑगस्ट रोजी मोठ्या जल्लोषात संत महंतासह मान्यवराच्या उपस्थित संपन्न झाली.

या प्रसंगी मुंबादेवी तरुण मंडळ व समस्त सुवर्णकार समाजाच्या वतीने आयोजित श्री साई सच्चरित्र पारायण सोहळ्याच्या सांगते प्रसंगी प.पु रमेशगिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने व मान्यवरांच्या शुभहस्ते महा आरती करत भव्य-दिव्य अशी मिरवणूक संपन्न होऊन उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, माजी नगराध्यक्ष ऐश्‍वर्या सातभाई, माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल, भाजपा शहराध्यक्ष दत्ता काले, दिलीप दारूणकर, नंदकुमार विसपुते, दिपकशेठ विसपुते, उद्धवशेठ विसपुते, विजय भडकवाडे, बबलू वाणी, कैलास जाधव, पप्पू पडियार, रंजन जाधव, विनोद चोपडा, संतोष साबळे, ज्ञानेश्‍वर (माऊली) गोसावी, शुभम भावसार ,कुणाल लोणारी, निखिल जोशी,गौरीश लोहारकर, मयूर लचुरे, आशिष निकुंभ, मुंबादेवीचे अध्यक्ष राहुल खडांगळे, अतुल काले, राहुल आढाव, संजय मंडलिक, राजीव दीक्षित आदींसह भाविक भक्त महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. याप्रसंगी मा. आ.स्नेहलता कोल्हे यांनी मुंबादेवी तरुण मंडळ व सुवर्णकार समाज गेल्या सतरा वर्षापासून नियमितपणे करत आयोजित करत असलेल्या श्री साई सच्चरित्र पारायण सोहळ्याचे कौतुक करत सर्व सभासदांचे अभिनंदन केले.

COMMENTS