Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगणक अभियंता ‘सेक्सटॉर्शन’च्या जाळ्यात

पुणे : समाजमाध्यमात अश्‍लील ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देऊन सायबर चोरट्यांनी कात्रज भागातील एका तरुणाकडून दहा लाख 42 हजार रुपयांची खंडण

New mumbai : महानगरपालिकेचा मनमानी कारभार… नेरूळ झोपडपट्टीवर चालवला बुलडोझर…. | LokNews24
दरोडा व घरफोडी गुन्ह्यातील सराईत फरार आरोपी जेरबंद
शिवसेना नेमकी कुणाची ?

पुणे : समाजमाध्यमात अश्‍लील ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देऊन सायबर चोरट्यांनी कात्रज भागातील एका तरुणाकडून दहा लाख 42 हजार रुपयांची खंडणी (सेक्सटॉर्शन) उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका तरुणाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
 तक्रारदार तरुण कात्रज भागातील आंबेगाव येथे राहायला आहे. तो एका सराफी पेढीत संगणक अभियंता (आयटी ऑफिसर) आहे. त्याच्या मोबाइल क्रमांकावर एका महिलेने संपर्क साधला (व्हिडीओ कॉल) होता. महिलेने तरुणाला जाळ्यात ओढून नकळत ध्वनिचित्रफीत तयार करण्यात आली. सायबर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देऊन त्याच्याकडे पैशांची मागणी केली. त्यानंतर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर पुन्हा संपर्क साधला. दिल्ली पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेतील आयुक्त श्रीवास्तव बोलत असल्याची बतावणी चोरट्यांनी केली. सायबर गुन्ह्याचा तपास करायचा आहे. त्यासाठी पैशांची आवश्यकता आहे, असे सांगून चोरट्यांनी तरुणाला धमकावले. त्याच्याकडून वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने दहा लाख 42 हजार रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय पुराणिक तपास करत आहेत.

COMMENTS