पंजाब प्रतिनिधी - पंजाबमधील जालंधरमध्ये रात्री उशिरा एका घराला आग लागल्याचा घटना समोर आली आहे. या आगीच्या घटनेत एकाच कुटुंबातील 2 मुलांसह 5 ज
पंजाब प्रतिनिधी – पंजाबमधील जालंधरमध्ये रात्री उशिरा एका घराला आग लागल्याचा घटना समोर आली आहे. या आगीच्या घटनेत एकाच कुटुंबातील 2 मुलांसह 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला. प्रशासनाने अद्याप याला दुजोरा दिलेला नाही. मृतांमध्ये घराच्या मालकाचाही समावेश आहे, तर घराबाहेर बसलेली त्याची वृद्ध पत्नी सुखरूप बचावली आहे. रूची, दिया, इंदरपाल, यशपाल घई आणि मनशा अशी मृतांची नावे आहेत. जालंधरच्या अवतार नगर येथील गल्ली क्रमांक 12 मध्ये ही घटना घडली. मृत यशपाल घई यांचा भाऊ राज घई यांनी सांगितले की, त्यांच्या भावाने फक्त 7 महिन्यांपूर्वी नवीन डबल डोअर रेफ्रिजरेटर विकत घेतला होता. रात्री उशिरा त्यांच्या कॉम्प्रेसरमध्ये मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर घराला आग लागली. 65 वर्षांच्या आसपास असलेला त्याचा भाऊ, त्याचा मुलगा, सून आणि घरात बसलेल्या दोन मुलींना घराबाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. त्यांची वृद्ध वहिनी घराबाहेर बसली होती, मात्र ती सुरक्षित आहे. असेही त्यांनी सांगितलं.फ्रिजच्या कॉम्प्रेसरमध्ये झालेल्या स्फोटानंतर घरात तसेच रस्त्यावर गॅस पसरला होता. गॅसमुळे घरात एवढी मोठी आग लागली होती की, अग्निशमन दलाचे कर्मचारी रात्री उशिरापर्यंत आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करत होते. आगीची माहिती मिळताच तात्काळ दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, मात्र आगीवर नियंत्रण मिळवता न आल्याने अग्निशमन दलाच्या आणखी गाड्या घटनास्थळी बोलवाव्या लागल्या.मात्र अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजलेल्या लोकांना घरातून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी कुटुंबातील तीन जणांना मृत घोषित केले, तर दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात रेफर केले. जिथे उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला.
COMMENTS