Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तक्रारदार शेख यांचा जबाब नोंदवला जाणार

लष्कराचे बनावट एनओसीप्रकरण खंडपीठात

अहमदनगर प्रतिनिधी- बांधकाम परवानगी मिळविण्यासाठी आर्मीस्टेशन हेडक्वार्टर अहमदनगरच्या नावाने बनावट एनओसी तयार करून नगरउपविभागीय अधिकारी कार्यालयाच

सिव्हीलच्या दारात उपचाराअभावी कोरोनाबाधिताचा मृत्यू
राजेंद्र गांधींनी दिले सुवेंद्र गांधींना आव्हान… नगर अर्बन बँकेची रणधुमाळी झाली सुरू
धारुर घाटात डॉ. आंबेडकर विकास मंचचा रास्ता रोको l LokNews24

अहमदनगर प्रतिनिधी– बांधकाम परवानगी मिळविण्यासाठी आर्मीस्टेशन हेडक्वार्टर अहमदनगरच्या नावाने बनावट एनओसी तयार करून नगरउपविभागीय अधिकारी कार्यालयाची फसवणूक केल्याच्या प्रकरणात येथील सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख(Shakir Sheikh) यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातयाचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्ती मंगेश पाटील व अभय वाघवासे यांच्यासमोर सुनावणी होऊन, कोतवाली पोलिस ठाण्यात यासंदर्भात दाखल गुन्ह्यात याचिकाकर्ते शेख यांचा जबाब नोंदवून घ्यावा तसेच तपासासाठी त्यांच्याकडे असलेली कागदपत्रे रेकॉर्डवर दाखल करून घ्यावीत, असे आदेश न्यायालयाने तपासी अधिकारी तथा पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे यांना दिले आहेत.

 नगर शहर व तालुक्यातील लष्कराच्या हद्दीलगतच्या मालमत्ता,प्लॉटवर बांधकाम परवानगीसाठी आर्मी हेडक्वार्टरकडून ना-हरकतदाखला दिला जातो. मात्र, उपविभागीय कार्यालयात दाखल करण्यात आलेल्या दाखल्यांपैकी काही दाखले बनावट असल्याचे समोर आले आहे. बबन भागचंद बेरड (रा. भिंगार ता.नगर), आमीर तकी मिर्झा (रा. मुकुंद नगर) व निलेश प्रेमराज पोखर्णा व इतर 5 जणांच्या प्रकरणात बनावट कागदपत्रे सादर करून उपविभागीय कार्यालयाची फसवणूक झाल्याची फिर्याद महसूल सहाय्यक संजय गोलेकर यांनी दिली आहे. त्यानुसार कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपअधीक्षक अनिल कातकडे याचा तपास करीत आहेत. या प्रकरणी शाकीर शेख हे दोन वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत. पोलिसांकडून केवळ तीनच प्रकरणात तपास सुरू आहे. इतरही अनेक प्रकरणात बनावट एनओसी देण्यात आलेली आहे. या प्रकरणांच्या तपासासाठी शेख हे पोलिसांना मदत करण्यास तयार आहेत व त्याअनुषंगाने त्यांच्याकडे असलेली कागदपत्रे रेकॉर्डवर घेऊन त्यांचा जबाब नोंदवून घ्यावा व त्यादृष्टीने सर्व एनओसींचा तपास करावा, अशी मागणी त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक व तपासी अधिकार्‍यांकडे केली होती. पण, त्याची दखल घेण्यात न आल्याने त्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात क्रिमिनल रिट-पिटिशन दाखल केले आहे. त्यावर नुकतीच सुनावणी होऊन न्यायालयाने कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासामध्ये शेख यांचा जबाब नोंदवून घ्यावा व त्यांच्याकडे असलेली इतर एनओसीं बाबतची कागदपत्रे व पुरावे रेकॉर्डवर घेऊन त्यादृष्टीने तपास करावा, असे आदेश न्यायालयाने तपासी अधिकार्‍यांना दिले. दरम्यान, बनावट एनओसी संदर्भात 1 कोटी 30 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे तपासात समोर आले असून, याबाबत पोलिसांकडून तपास होत नसल्याने शेख यांनी केंद्रीय गुन्हे अन्वेषण(सीबीआय) विभागाकडेही तक्रार केली आहे.

त्याचाही अहवाल मागवला– उपविभागीय कार्यालयाकडून फिर्याद दाखल करीत असतानामूळ आरोपींना वाचवून अज्ञात आरोपींविरोधात फिर्याद देण्यात आल्याप्रकरणी शाकीरशेख यांनी उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्याविरोधात महसूल विभागाच्या अवरसचिवांकडे तसेच विभागीय आयुक्तांकडे तक्रार करून चौकशीची मागणी केलीहोती. विभागीय आयुक्त कार्यालयाने याची दखल घेत याबाबत स्वयंस्पष्ट अहवालअभिप्रायासह सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत.

COMMENTS