Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकर्‍यांना त्वरित नुकसानभरपाई द्या

लातूर प्रतिनिधी - लातूर ग्रामीण मतदारसंघ आणि लातूर जिल्ह्यात जवळपास महिनाभर पावसाने खंड दिल्याने सोयाबीनसह इतर खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आ

आ. चंद्रशेखर कदम यांच्या हस्ते कोविड केअर सेंटरचा शुभारंभ | ‘माझं गाव, माझी बातमी’ | LokNews24
नितीश कुमार यांची आक्रमक रणनीती ! 
जात वैधता प्रमाणपत्राच्या मार्गदर्शनासाठी आज ऑनलाईन वेबनार

लातूर प्रतिनिधी – लातूर ग्रामीण मतदारसंघ आणि लातूर जिल्ह्यात जवळपास महिनाभर पावसाने खंड दिल्याने सोयाबीनसह इतर खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकर्‍यांना त्वरित नुकसानभरपाई द्या, अशी मागणी लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केली. पावसाने पाठ फिरवल्याने लातूर ग्रामीण मतदारसंघ आणि लातूर जिह्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शेतकर्‍यांवर ओढावलेल्या परिस्थितीची त्वरित दखल घेऊन काँग्रेस पक्षाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांना लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी निवेदन दिले.
या वेळी लातूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, प्रवीण पाटील, एकनाथ पाटील, रमेश सूर्यवंशी, लक्ष्मण मोरे, अजय मार्डीकर, कैलास कांबळे, करीम तांबोळी, आसिफ बागवान, दत्तात्रय पाटील, काशिनाथ वाघमारे, अंगदराव गायकवाड, संदिपान सूर्यवंशी, नरेश पवार, पवनकुमार गायकवाड, फारुख शेख, खाजाभाई शेख, तबरेज तांबोळी, अशोक सूर्यवंशी, सिद्धेश्वर जळकोटे, प्रवीण कांबळे, पंकज सोनवणे, ज्ञानोबा गवळे, प्रवीण कांबळे, वैभव त्रिभुवन, बब्रुवान गायकवाड, फारुख शेख, शीतल मोरे, प्रमोद जोशी, सुलेखा कारेपूरकर, सुनील पडिले, देविदास बोरूळे पाटील, पद्माकर वाघमारे आदी उपस्थित होते.

COMMENTS