Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाच महसूल मंडळाचा समावेश करून शेतकर्‍यांना भरपाई द्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे माजी आ. मुरकुटे यांची मागणी

नेवासा फाटा/प्रतिनिधी ः मागील वर्षी सप्टेंबर ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टी मुळे नेवासा तालुक्यात शेतकर्‍यांचा खरीप व रब्बी हंगाम वाया गेल

वधू-वर मेळाव्यातून राज्यातील तेली समाज एकवटला
पोलिस ठाण्यांतून यापुढे…नो हॅपी बर्थ डे…
नेप्ती फाट्यावर संतप्त शेतकरी ग्रामस्थांचा भारनियमन विरोधात रास्ता रोको

नेवासा फाटा/प्रतिनिधी ः मागील वर्षी सप्टेंबर ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टी मुळे नेवासा तालुक्यात शेतकर्‍यांचा खरीप व रब्बी हंगाम वाया गेला. राज्य सरकारने अशा बाधित शेतकर्‍यांच्या पिकांचे पंचनामे केले. त्यानुसार तालुक्यात आठ पैकी तीन महसूल मंडलात भरपाई जाहिर झाली. मात्र पाच महसूल मंडलातील शेतकरी यापासून वंचित राहिले अशा वंचित शेतकर्‍यांना भरपाई मिळावी यासाठी मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांची माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी भेट घेऊन निवेदन दिले आहे.
 नेवासा तालुक्यातील सर्व महसूल मंडलात मागील वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टी मुळे तालुक्यात आठ महसूल मंडलात सारखाच पाऊस झाल्याने शेतकर्‍यांचे 100 टक्के पिकांचे नुकसान झाले.या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे महसूल व कृषी विभागाकडून रितसर पंचनामे होऊन तालुक्यात 70 हजार शेतकर्‍यांचे 51 हजार 165 हेक्टर शेतीवरील पिकांचे नुकसान झाले त्यामुळे अशा बाधित शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याचे काम  आठ पैकी तीन महसूल मंडलात जाहिर झाले पंरतु उर्वरित पाच महसूल मंडलात देखील 100 टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. या पाच महसूल मंडलास 100 टक्के नुकसान भरपाई मिळावी यासाठी नेवाशाचे भाजपा मा आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेऊन राहिलेल्या शेतकर्‍यांना भरपाई मिळावी अशी मागणी माजी आमदार मुरकुटे यांनी केली आहे. नेवासा तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे पुन्हा नुकसान झाल्याने अशा शेतकर्‍यांचे सरसकट पंचनामे करावे असे नेवासा तहसीलदार यांना सांगून नुकसान झालेल्या शेतकर्‍यांन संदर्भात मुखमंत्र्याना माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी माहिती दिली आहे.

COMMENTS