Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डोंबिवलीमध्ये पुन्हा कंपनीला आग

मुंबई ः डोंबिवली एमआयडीसीमध्ये कंपन्यांमध्ये आग लागण्याचे सत्र सुरूच असून, बुधवारी सकाळी पुन्हा फेज-2 मध्ये आग लागली. या वेळी स्फोटांचे मोठे आवाज

महानंदला उर्जितावस्था प्राप्त करून देवू – मंत्री विखे
नाशिक येथे नवीन शासकीय महाविद्यालयासाठी मौजे म्हसरुळ येथील जमीन हस्तांतरणास शासनाची मंजूरी : मंत्री दादाजी भुसे
इंदुरीकर महाराज पुन्हा अडचणीत; ‘ते’ वक्तव्य भोवणार?

मुंबई ः डोंबिवली एमआयडीसीमध्ये कंपन्यांमध्ये आग लागण्याचे सत्र सुरूच असून, बुधवारी सकाळी पुन्हा फेज-2 मध्ये आग लागली. या वेळी स्फोटांचे मोठे आवाज आल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कंपनीमध्ये अनेक कामगार अडकले असल्याची भीती व्यक्त होत आहे. आग एवढी प्रचंड आहे की, दुरपर्यंत स्फोटाचे आवाज आणि धुराचे लोट पसरले आहेत. या परिसरात अभिनव नावाची शाळा देखील आहे. त्यामुळे भीती जास्त वाढली होती. मात्र, शाळेतील विद्यार्थ्यांना तात्काळ घरी पाठवण्यात आले आहे.

COMMENTS