Homeताज्या बातम्यादेश

’जेलर’ बघण्यासाठी चेन्नई-बंगलोरमध्ये कंपन्यांना सुटी

चेन्नई ः ज्येष्ठ अभिनेता रजनीकांतची के्रझ अजूनही संपलेली नाही. त्याच्या नव्या चित्रपटावर प्रेक्षकांच्या उड्या पडतांना दिसून येतात. रजनीकांतच्या ज

सीरम रेशमी आणि चमकदार केसांची इच्छा पूर्ण करेल, फक्त ते लावण्याची योग्य पद्धत जाणून घ्या I LOKNews24
संभाजी भिडेंना पोलिसांची नोटीस
सीबीआयने घेतली सिसोदिया यांच्या बँक लॉकरची झाडाझडती

चेन्नई ः ज्येष्ठ अभिनेता रजनीकांतची के्रझ अजूनही संपलेली नाही. त्याच्या नव्या चित्रपटावर प्रेक्षकांच्या उड्या पडतांना दिसून येतात. रजनीकांतच्या जेलर सिनेमाची सध्या सगळीकडे प्रचंड क्रेझ आहे. रजनीकांतचा सिनेमा जेव्हा जेव्हा येणार असतो तेव्हा त्याचा सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये एक-दोन महिने आधीपासुनच सिनेमाविषयी उत्सुकता निर्माण होते.10 ऑगस्ट रोजी रिलीज होणारा रजनीकांतचा ’जेलर’ हा चित्रपट संपूर्ण भारतात बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग करेल अशी अपेक्षा असून, हा चित्रपट पाहण्यासाठी चेन्नई – बंगलोरमधील कंपन्यांनी आपल्या कामगारांना सुटी जाहीर केली आहे. रजनीकांत जवळपास 2 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत.

COMMENTS