Homeताज्या बातम्यादेश

समलिंगी जोडप्यांच्या समस्यांसाठी समिती

केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात आश्‍वासन

नवी दिल्ली प्रतिनिधी ःसमलिंगी विवाहाला भारतात कायदेशीर परवानगी मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात वादळी सुनावणी सुरू असून, यासंदर्भातील कायदा करण्या

देवळाली प्रवरात साई भक्तां कडुन धिरेंद्र शास्ञीच्या तैलचिञाची होळी  
सिगरेट पिण्यास मनाई केल्याने हॉटेलमध्ये चाकू हल्ला.
संशोधन संस्थेच्या माध्यमातून तरुणाईच्या पंखांना बळ देण्याचे काम व्हावे : मुख्यमंत्री

नवी दिल्ली प्रतिनिधी ःसमलिंगी विवाहाला भारतात कायदेशीर परवानगी मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात वादळी सुनावणी सुरू असून, यासंदर्भातील कायदा करण्याचा आमचा अधिकार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. याचिकाकर्त्यांचे वकिल अभिषेक सिंघवी यांनी याप्रकरणी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे ठरवले आहे. तर, दुसरीकडे हा कायदा लागू करण्यास केंद्र सरकार अनुत्सुक असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. परंतु, समलिंगी जोडप्यांच्या समस्यांचे निवारण करण्याकरता कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यास केंद्र सरकारने तयारी दर्शवली आहे. केंद्राने बुधवारी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात माहिती दिली.
समलिंगी विवाहाला कायदेशरी परवानगी देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी सुरू असून केंद्र सरकारच्या वतीने जनरल सॉलिसटीर तुषार मेहता युक्तीवाद करत आहेत. बुधवारी त्यांनी न्यायालयात माहिती दिली की, सरकार सकारात्मक आहे. आम्ही ठरवले आहे की समलिंगी जोडप्यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी एकापेक्षा जास्त मंत्रालयात समन्वय असणे गरजेचे आहे. त्यामुळे कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाईल. समलिंगी जोडपी किंवा याचिकाकर्ते या समितीकडे जाऊन त्यांचे प्रश्‍न मांडू शकतात. जास्तीत जास्त समस्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही ते पुढे म्हणाले. परंतु, या समितीवर याचिकाकर्त्यांचे वकिल अभिषेक सिंघवी यांनी आक्षेप घेतला. ही एक प्रशासकीय बाब आहे. कायदेशीर कचाट्यात पकडणे ही वेगळी गोष्ट असल्याचा युक्तीवाद त्यांनी केला आहे.

COMMENTS