Homeताज्या बातम्यादेश

शेतकर्‍यांना सक्षम बनवण्यासाठी कटिबद्ध

पंतप्रधान मोदी यांची ग्वाही ; पिकांच्या 109 नवीन वाणांचे केेले उद्घाटन

नवी दिल्ली ः देशातील शेतकर्‍यांचे सक्षमीकरण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. नवी दिल्लीत रविवारी

नरेंद्र मोदी आज तिसर्‍यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार ?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दिल्ली मेट्रोमधून प्रवास

नवी दिल्ली ः देशातील शेतकर्‍यांचे सक्षमीकरण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. नवी दिल्लीत रविवारी पिकांच्या 109 नवीन वाणांचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. पिकांच्या, हवामानाला अनुरुप आणि जास्त उत्पादन देणार्‍या या वाणांमुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ होईल, असेही त्यांनी पुढे सांगितले.
शेतकरी नैसर्गिक शेतीकडे वळत असल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी यावेळी शेतकर्‍यांचे अनुभवही ऐकले आणि नैसर्गिक शेतीच्या लाभांबाबत सविस्तर चर्चा केली.पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावरील आपल्या टिप्पणीत म्हटले आहे की, आम्ही आपल्या शेतकरी बंधू-भगिनींना सबळ बनवण्यासाठी वचनबद्ध आहोत.  याच अनुषंगाने, दिल्लीत पिकांच्या 109 नवीन वाणांचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली.  या हवामानानुरुप आणि भरघोस पीक देणार्‍या वाणांच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळे आपल्या शेतकर्‍यांच्या उत्पन्नातही वाढ होईल. मला समाधान आहे की आमचे शेतकरी बंधू- भगिनीही नैसर्गिक शेतीकडे वेगाने वाटचाल करत आहेत. आज त्यांचे अनुभव जवळून जाणून घेण्याची संधी मिळाली.  यावेळी आम्ही नैसर्गिक शेतीच्या फायद्यांवरही सविस्तर चर्चा केली. यावेळी पंतप्रधानांनी बाजरीच्या महत्त्वावर चर्चा केली तसेच लोक आता पौष्टिक आहाराकडे कसे वळत आहेत हे अधोरेखित केले. नैसर्गिक शेतीचे फायदे आणि सेंद्रीय शेतीबद्दल सामान्य लोकांचा वाढता विश्‍वास याबद्दलही त्यांनी सांगितले. लोक सेंद्रीय पदार्थांचे सेवन आणि मागणी करू लागले आहेत असेही ते पुढे म्हणाले. नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या प्रयत्नांचे शेतकर्‍यांनी कौतुक केले. जनजागृतीसाठी कृषी विज्ञान केंद्रांनी (घतघ) घेतलेल्या भूमिकेचेही शेतकर्‍यांनी कौतुक केले. कृषी विज्ञान केंद्रांनी त्यांच्या लाभांबद्दलची  जागरूकता वाढवण्यासाठी दर महिन्याला विकसित केल्या जाणार्‍या नवीन वाणांच्या फायद्यांविषयी शेतकर्‍यांना स्वयंस्फूर्तीने माहिती द्यावी, अशी सूचना पंतप्रधानांनी केली. या नवीन पिकांच्या वाणांच्या विकासाबद्दल पंतप्रधानांनी शास्त्रज्ञांचीही प्रशंसा केली. वापरात नसलेली पिके मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पंतप्रधानांनी दिलेल्या सूचनेनुसार आपण काम करत असल्याची माहिती शास्त्रज्ञांनी दिली. पंतप्रधानांनी वाटप केलेल्या 61 पिकांच्या 109 वाणांमध्ये 34 शेती पिके आणि 27 फळ बागायती पिकांचा समावेश आहे. शेतातील पिकांमध्ये बाजरी, चारा पिके, तेलबिया, कडधान्ये, ऊस, कापूस, तृणधान्ये आणि इतर फायदेशीर पिकांसह विविध बियाण्यांचे वाटप करण्यात आले. बागायती पिकांमध्ये विविध प्रकारची फळे, भाजीपाला पिके, लागवड पिके, कंदमुळे, मसाले, फुले आणि औषधी पिकांचे वाटप करण्यात आले.

COMMENTS