Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ. तनपुरे यांच्या प्रयत्नातून 21 नवीन रोहित्रे बसविणार

राहुरी/प्रतिनिधी ः माजी उर्जा राज्यमंत्री व विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांचे विशेष प्रयत्नातून सुमारे 21 नवीन रोहित्रे बसविण्यास सुमारे 1 कोट

भाचेबा तुमच्या मतदारसंघाप्रमाणे मामाच्या मतदारसंघाकडे लक्ष द्या : जयंत पाटील यांची भाचे तनपुरेंकडे मागणी
दुष्काळी परिस्थिती असतानाही शेतकर्‍याकडे दुर्लक्ष
नगरमध्ये रंगणार राजकीय शिमगा… भाजप विरोधात महाविकास आघाडी सामना

राहुरी/प्रतिनिधी ः माजी उर्जा राज्यमंत्री व विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांचे विशेष प्रयत्नातून सुमारे 21 नवीन रोहित्रे बसविण्यास सुमारे 1 कोटी 38 लाख 90 हजार रुपये खर्चास मंजुरी मिळाली आहे. यामुळे विजेचा प्रश्‍न मार्गी लागण्यास हातभार लागणार आहे. आमदार तनपुरे यांनी विशेष प्रयत्न केल्याने  नव्याने रोहित्रे मिळाली आहेत.
यामध्ये करंजी (क्षेत्रे वस्ती) ता. पाथर्डी 17  लाख 80 हजार, शंकरवाडी (भवार वस्ती)ता.पाथर्डी 8 लाख 90 हजार, राघोहिवरे (मराठे वस्ती)8 लाख 15 हजार, गीतेवाडी (वाघदरा) 8 लाख 20 हजार,  करंजी ता.पाथर्डी (इनाम वस्ती) 5 लाख, मिरी (तोडमल वस्ती) ता.पाथर्डी 5 लाख, शिराळ (घोरपडे वस्ती) ता.पाथर्डी 5 लाख, आडगाव (सोन्नर) ता.पाथर्डी 5 लाख, पांगरमल (आव्हाड वस्ती) ता. नगर 4 लाख 58 हजार,  नागरदेवळे (हजारे वस्ती) ता.नगर 6 लाख, ताहराबाद (हराळे वस्ती)ता. राहुरी 5 लाख 75 हजार, म्हैसगाव (हुलुळे वस्ती) 4 लाख 90 हजार, कोळेवाडी (गावठाण) 5 लाख 36 हजार, व (जाधव वस्ती) 4 लाख 90 हजार, जांभळी (पवार-बर्डे वस्ती) 5 लाख 65 हजार,  गुहा (ओहोळ वस्ती) 6 लाख 82 हजार, कानडगाव (संसारे वस्ती) 8 लाख, सात्रळ (पडघलमल वस्ती) 7 लाख, सूर्यभान देवरे (शिलेगाव) 3 लाख 78 हजार, सात्रळ (पडघमल वस्ती पाणीपुरवठा) 7 लाख 46 हजार, ताहराबाद  (विधाटे वस्ती) 7 लाख 65 हजार असा निधी वितरित होऊन नवीन रोहित्रे बसणार आहे. यामुळे संबंधित गावातील लाभधारकांनी आमदार तनपुरे यांचे आभार मानले.

COMMENTS