Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सण-उत्सव पार्श्वभूमीवर पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

लातुरात विविध ठिकाणी नाकाबंदी

लातूर प्रतिनिधी - सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात बुधवारी पहाटेपर्यंत कोम्बिंग ऑपरेशन, नाकाबंदी, वाहन तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. दरम्

तुळजाभवानी मंदिरात आता ड्रेसकोड
बोरगावकरांच्या ’नदीष्ट’ला 5 लाखांचा भाषा सन्मान
लातूर जिल्ह्यातील 56 केंद्रांवर 25673 विद्यार्थ्यांनी दिली ‘नीट’ची परीक्षा

लातूर प्रतिनिधी – सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात बुधवारी पहाटेपर्यंत कोम्बिंग ऑपरेशन, नाकाबंदी, वाहन तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. दरम्यान, फरार आरोपींना अटक करणे, लॉजेस, हॉटेलची तपासणी करून मोठी कारवाई करण्यात आली आहे.
मंगळवारी रात्रीपासून ते बुधवारी पहाटे 5 वाजेपर्यंत करण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांनी प्रत्यक्ष मार्गदर्शन करून, जिल्ह्यातील 28 अधिकारी, 124 पोलिस अंमलदारांची विविध पथके तयार करून, मोठ्या प्रमाणावर कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. लातूर पोलिसांनी 105 लॉजेस, हॉटेल्सची तपासणी केली असून, न्यायालयाकडून काढण्यात आलेल्या, सतत पोलिसांना चकवा देत फरार असलेल्या 13 आरोपींना समन्स जाऊन अटक करण्यात आली. त्याचबरोबर जिल्ह्यात विविध 25 ठिकाणी नाकाबंदी करून, 802 वाहनांची तपासणी केली, तर 15 मार्गस्थळाची तपासणी करण्यात आली आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या 59 सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली, तर गुन्हा करण्याच्या प्रयत्नातील एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात एकाच रात्री 16 अवैध दारूविक्री प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावेळी टाकण्यात आलेल्या छाप्यामध्ये अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत जिल्ह्यातील त्या-त्या ठाण्याचे पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांचा सहभाग होता.

COMMENTS