Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोकशाहीसाठी मतदान करण्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचे ढाकणवाडी गावाला आवाहन..

पाथर्डी : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पाथर्डी तालुक्यातील वडगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या ढाकणवाडी गावाने गावाला सोयी सुविधा पासून वंचित असून

विश्‍वस्तरीय ऑनलाईन लेखन स्पर्धेत सहभागी व्हा ः राजेंद्र फंड
न्यायालयीन ऑनलाईन प्रक्रियेने कारकूनी संपली ः काका बैरागी
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला 200 जागांवर आघाडी

पाथर्डी : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पाथर्डी तालुक्यातील वडगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या ढाकणवाडी गावाने गावाला सोयी सुविधा पासून वंचित असून रस्ता देखील नसल्याने मतदानावर बहिष्कार टाकला होता.त्याची पुन्हा पुनरावृत्ती होणार नाही म्हणून खबरदारीसाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.

शनिवारी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्यासह जिल्हा प्रशासनाने पाथर्डी तालुक्यातील ढाकणवाडी येथील मतदान केंद्राची पाहणी करून ग्रामस्थांशी चर्चा करून यावर्षी बहिष्कार करू नये असे सांगितले.गावकऱ्यांच्या मागणीप्रमाणे मुख्य असलेला रस्त्याचे काम प्रगतीपथावर सुरु आहे.त्याचप्रमाणे विविध कामही मार्गी लागले असून निवडणुकीनंतर अजूनही कामे पूर्ण होणार आहे.मागील निवडणुकीप्रमाणे आता निवडणुकीत बहिष्कार आपण मतदारांनी टाकू नये,आपला मागील निवडणुकीत असलेला रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला असुन सर्वांनी मतदान करून शंभर टक्के मतदान करून आपला हक्क बजावून लोकशाही अधिक बळकट करा असे आवाहन देखील करण्यात आले.जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर,प्रांतधिकारी प्रसाद मते, तहसीलदार उद्धव नाईक, गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांनी ढाकणवाडी गावात जाऊन ग्रामस्थांशी चर्चा केली.यावेळी उपसरपंच रवींद्र ढाकणे, दत्तू ढाकणे, रावसाहेब ढाकणे, सोमा बडे, पंचायत समितीचे अभियंता अनिल सानप, ग्रामसेवक रोहिदास आघाव, तलाठी मनोज खेडकर उपस्थित होते.

चौकट:- पाथर्डी तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती बिकट चालली असून मोठ्या प्रमाणात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो त्याच्याही परिस्थितीचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेऊन तालुक्यात ज्या ठिकाणी पाण्याचे उद्भव आहेत त्या ठिकाणाहून टँकर भरण्या संदर्भात काही सूचना तालुका प्रशासनाला जिल्हाधिकारी सालीमठ यांनी दिल्या आहेत.

COMMENTS