Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कॉ. कातोरेंवरील हल्ल्याच्या प्रतिकाराबद्दल माकपच्या कार्यकर्त्यांचे कौतुक : डॉ. अशोक ढवळे

अकोले ः शिर्डी लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीचे उमेदवाराचा राजूर येथील प्रचार सभेत कॉम्रेड तुळशीराम कातोरे यांनी ठाकर समाजाच्या बोली भाषेत जबरदस्

28 वर्षांनी पुन्हा भरली इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांची शाळा
प्रोजेक्टचे रूपांतर प्रॉडक्टमध्ये व्हावे ः नितीनदादा कोल्हे
कोरोनाच्या संकटाचा विकासावर परिणाम होवू दिला नाही – आ. आशुतोष काळे

अकोले ः शिर्डी लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीचे उमेदवाराचा राजूर येथील प्रचार सभेत कॉम्रेड तुळशीराम कातोरे यांनी ठाकर समाजाच्या बोली भाषेत जबरदस्त भाषण करून ठाकर समाजाच्या नावाने सौदेबाजी करणारांचे बिंग उघडे पाडले होते. या सर्वाचा परिणाम म्हणून या जातीयवादी गुंड प्रवृत्तींनी देवठाण येथे कॉम्रेड तुळशीराम कातोरे यांच्यावर निवडणुकीच्या दुसर्‍या दिवशी पूर्व नियोजन करून हल्ला केला. मात्र हा हल्ला माकपच्या कार्यकर्त्यांनी प्रतिकार केला होता.
निवडणुकीच्या दुसर्‍या दिवशी दिनांक 14 मे रोजी सकाळी 8.00 वाजता देवठाण येथे मुख्य चौकात चहासाठी कॉ. तुळशीराम यास बोलावून घेऊन त्यास, तू आमच्या नेत्यावर का बोललास असा जाब विचारत हा हल्ला केला. आजूबाजूच्या गावांमधून व शेजारच्या तालुक्यातून गाड्या व पैसे देऊन 200 ते 250 जणांना हल्ल्यासाठी जमविण्यात आले होते. बहुतांश हल्लेखोर हे 15 ते 18 वयोगटाचे होते. बोलता येणार नाही इतकी दारू पाजलेले होते. आपल्यावर हल्ला होतोय हे लक्षात आल्यावर तुळशीराम याने डॉ. अजित नवले यांना फोन करून मदतीची मागणी केली. कार्यकर्त्यावर हल्ला झाल्याचे समजताच माणसे जमविण्याची सुद्धा वाट न पहाता एकटेच मोटारसायकल चालवीत, 25-30 किलोमीटरचा प्रवास काही मिनिटात पूर्ण करून डॉ. अजित नवले देवठाण येथे पोहचले. समोरच्या हल्लेखोरांचा उन्माद पाहता गावातील काही दोन तीन जण सोडता कुणीच तुळशीराम पर्यंत जाण्याचे धाडस करत नव्हते. अशा बिकट परिस्थितीत डॉ. अजित नवले 200-250 जणांच्या बेधुंद जमावात एकटे घुसले. तुळशीरामला सोडवीत जवळ घेतले व अशा अत्यंत प्रक्षोभक वातावरणातही लाल बावटे की जय ! इन्कलाब जिंदाबाद ! च्या घोषणा देत तुळशीरामला बाहेर काढले. पोलीस त्यानंतर तेथे पोहचले. त्यांनीही नंतर मदत केली. तुळशीराम कातोरे यांच्या हल्लेखोरांवर कारवाई व्हावी यासाठी त्याच दिवशी तातडीने माकपचे असंख्य कार्यकर्ते, महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते व कार्यकर्ते प्रचंड संख्येने पोलीस स्टेशनमध्ये एकत्र आले. बहुतांश राजकीय कार्यकर्ते, नेते व तालुक्यातील जनतेने कॉम्रेड तुळशीराम यांच्यावरील हल्ल्याचा कडव्या शब्दात धिक्कार केला. डॉ. अशोक ढवळे यांनी घटना समजताच डॉ. अजित नवले यांच्याकडून माहिती घेत योग्य ते सर्व सहकार्य केले, आणि कॉ. तुळशीराम कातोरे यांना फोन करून त्यांच्या धाडसाचे कौतुक केले.

 माकपचे डॉ. अजित नवले, ज्ञानेश्‍वर काकड, नाथू पथवे यांच्यासह मित्र पक्षाचे मधुकर तळपाडे, सतीश भांगरे, राम सहाणे, सीताबाई पथवे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यावेळी हजर होते. अकोले तालुक्यात गेले दोन वर्ष गुंडागर्दी, जातीयवाद, धार्मिक संघर्ष व गुन्हेगारी वाढते आहे. विचारांचा प्रतिवाद विचाराने करण्याऐवजी लोक शारीरिक हल्ले करून दहशत पसरवू  पहात आहेत. जातीच्या संघटना करून जाती जातीमध्ये वाद वाढवीत आपले राजकारण साधू पहात आहेत. या पार्श्‍वभूमीवर तालुक्यातील ज्येष्ठ नेते दशरथ सावंत व कॉ. कारभारी उगले यांनी दिनांक 19 मे रोजी हल्ल्याच्या तिसर्‍या दिवशी अकोल्यात सर्वपक्षीय विचार सभेचे नियोजन केले. तालुक्याचे आ. डॉ. किरण लहामटे, अगस्ती साखर कारखान्याचे चेअरमन सीताराम गायकर, ज्येष्ठ नेते मधुकर नवले, डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, मधुकर तळपाडे, बी.जे. देशमुख, सतीश भांगरे, दिलीप भांगरे, बाजीराव दराडे, विनय सावंत, महेश नवले, अशोक देशमुख, डॉ. संदीप कडलग, वसंत मनकर, माधव तीटमे, आनंदा नवले, लक्ष्मण नवले, मंदा नवले, ज्येष्ठ विचारवंत शांताराम गजे, भाऊसाहेब चासकर यांच्यासह भाजप वगळता सर्व राजकीय पक्षांचे सर्व मान्यवर प्रमुख नेते, कार्यकर्ते, विचारवंत व बुद्धिजीवी या बैठकीला हजर होते. विचाराचा प्रतिवाद विचाराने केला पाहिजे या आशयाचा ठराव यावेळी सर्वानुमते मंजूर झाला. तालुक्यात वाढत असलेल्या अपप्रवृत्ती रोखण्यासाठी ‘सामुहिक शहाणपण’ दाखवीत कार्य करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. कॉ. तुळशीराम कातोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा धाडसाने आणि योग्य मार्गाने प्रतिकार करीत वैचारिक राजकारण पुढे घेऊन गेल्याबद्दल डॉ. अशोक ढवळे यांनी माकपच्या अकोले युनिटचे हार्दिक अभिनंदन केले आहे. 

COMMENTS