Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात सीएनजी महागला

प्रती किलोसाठी मोजावे लागणार 93 रुपये

पुणे/प्रतिनिधी ः पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरवाढीमुळे अनेकजण सीएनजीला प्राधान्य देत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सीएनजीच्या दरात देखील मोठ

मनू भाकरने पटकावले कांस्यपदक
मुंबईत एसी लोकलवर दगडफेक
नागपूरमध्ये पोलीस उपनिरीक्षकाची गळफास लावून आत्महत्या

पुणे/प्रतिनिधी ः पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरवाढीमुळे अनेकजण सीएनजीला प्राधान्य देत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सीएनजीच्या दरात देखील मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे. पुण्यात सीएनजीच्या दरात वाढ झाली असून आता नव्या दाराने सीएनजी पुणेकरांना विकत घ्यावा लागणार आहे. आधीच पुण्यातील नागरिक महागाईने त्रस्त असतांना आता त्यांना सीएनजीसाठी प्रती किलो मागे 93 रुपये मोजावे लागणार आहे.

पुण्यात आता पर्यन्त तब्बल दोन ते तीन वेळा सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून तब्बल 6 रुपयांनी वाढ झाली आहे. पुनयासोबतच गुजरातमध्येही आजपासून सीएनजीच्या दर वाढले आहेत. अदानी टोटल गॅस लिमिटेडने गुजरातमध्ये सीएनजीच्या किमतीत 1 रुपये प्रति किलोने वाढ केली असून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.  काही दिवसांपूर्वीच गुजरात गॅसने सीएनजी आणि पाइप्ड कुकिंग गॅसच्या (पीएनजी) किमतीत 3.5 रुपयांनी वाढ केली होती.

COMMENTS