Homeताज्या बातम्यासंपादकीय

हवामान बदल आणि कॉप-29 !

भारतासारख्या सर्वाधिक लोकसंख्या असणार्‍या देशात दिवाळीमध्येच प्रदूषण किती उंच पातळीवर पोहोचले होते, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. मुंबई, पुणे

विद्युत वाहनांना मंत्र्यांचीच नकारघंटा
नबावावरून बेबनाव
अराजकता निर्माण करण्याचा डाव

भारतासारख्या सर्वाधिक लोकसंख्या असणार्‍या देशात दिवाळीमध्येच प्रदूषण किती उंच पातळीवर पोहोचले होते, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. मुंबई, पुणे, राजधानी दिल्लीतील हवा प्रदूषित झाल्यामुळे अनेकांना श्‍वास घेणे देखील मुश्कील झाले होते. त्यामुळे हवामान बदलाचा आणि प्रदूषणाचा फटका केवळ श्‍वास घेण्यापुरताच मर्यादित नाही तर, त्याचा मोठा फटका कृषी क्षेत्राला देखील बसतांना दिसून येत आहे. अतिवृष्टीमध्ये वाढ होणे, दुष्काळी परिस्थिती निर्माण होणे, यासारख्या बाबी निर्माण होतांना दिसून येत आहे. त्यासोबतच मानवी आरोग्य देखील धोक्यात येतांना दिसून येत आहे. त्यामुळे हवामान बदलाचा प्रामुख्याने विचार करण्याची गरज आहे. त्याचमुळे अझरबैजानची राजधानी बाकूमध्ये होत असलेल्या हवामान परिषदेच्या कॉप-29 विशेष महत्व प्राप्त होतांना दिसून येत आहे.
काही वर्षांपूर्वी पॅरिस करार करण्यात आला होता, त्यानंतर आता बाकू येथे होत असलेल्या हवामान परिषदेला विशेष महत्व प्राप्त होत आहे. या परिषदेत हवामान अर्थपुरवठा आणि नुकसान निधीसारखे मुद्दे कळीचे ठरणार आहे. वास्तविक पाहता हवामान बदलामुळे अतिवृष्टींच्या घटनांत वाढ होतांना दिसून येत आहे. नुकत्याच एका अहवालानुसार जागतिक पातळीवर तापमानात 1.7 अंश सेल्सिअसने वाढ झाल्यास अतिवृष्टीच्या घटनांमध्ये 1.7 पटीने वाढ होईल, असा अंदाज ‘क्लायमॅट अ‍ॅनालिटिक्स’ या संस्थेने व्यक्त केला आहे. त्यांचा अंदाज हा धोक्याचा इशारा देणारा आहे. त्यामुळे गांभीर्याने पावले उचलण्याची खरी गरज आहे. आगामी काही दशकांमध्ये हवामान बदलाचा मुद्दा कळीचा ठरणार आहे. कारण रस्त्यावर धावणारी कोट्यावधी वाहने, वाढती लोकसंख्या यामुळे होणारे प्रदूषण भविष्यासाठी धोक्याची घंटा आहे. वास्तविक पाहता वाढती वाहनांची संख्या, वाढती कारखानदारी, वाढत्या वातानुकुलित इमारती या सातत्याने कार्बन डाय ऑक्साइडचे उत्सर्जन वाढवीत आहेत. जनावरांचे रवंथ करण्यामधून मिथेन वायुचे उत्सर्जन वाढत आहे. भात खाचरात होणारा अतिरिक्त नायट्रोजन खतांचा वापर नायट्रस ऑक्साइड्चे प्रमाण वाढवत आहे. त्यामुळेच एका बाजूस वायूप्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. तर दुसर्‍या बाजूस कार्बन डाय ऑक्साइड वापरणारी वने व वनस्पती मोठ्चा प्रमाणावर नष्ट होत आहेत. आशिया खंडातील 60 दशलक्ष हेक्टर जंगल, आफ्रिका खंडातील 55 दशलक्ष हेक्टर जंगल आणि लॅटिन अमेरिकेतील 85 दशलक्ष हेक्टर जंगल मानवाने आजपर्यंत नष्ट केली आहेत. म्हणजेंच कार्बन डाय ऑक्साइड वापरणारी यत्रणा मानवाने नष्ट केली आहे. त्यामुळे हवेत कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण वाढत आहे. सूर्यप्रकाशापासून मिळणारी ऊर्जा व उष्णता कार्बन डाय ऑक्साइड वायू धरून ठेवतो. त्यामुळे पृथ्वीच्या वातावरणाचे तापमान वाढत आहे. त्यामुळेच त्याला जागतिक तापमान वाढ असे नामकरण केले आहे. त्यामुळे हवामान बदलामुळे अतिवृष्टी, दुष्काळ यासारखे परिणाम होतांना दिसून येत आहे. महाराष्ट्राचा विचार करता, सन 1972 साली भारतात व महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला, त्यावेळी महाराष्ट्रात 12 जिल्ह्यातील 84 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाले. सन 1986 मध्ये महाराष्ट्रात 14 जिल्हे दुष्काळी आणि 114 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले. सन 2003 मध्ये 14 जिल्हे दुष्काळी तर 118 तालुके दुष्काळग्रस्त होते. सन 2012 मध्ये 18 जिल्हे दुष्काळी तर 123 तालुके दुष्काळग्रस्त होते. तर 2015 मध्ये 28 जिल्हे दुष्काळी आणि 136 तालुके दुष्काळग्रस्त ठरले. एकूणच दुष्काळाची व्याप्ती एका बाजूस विस्तारत असून दुष्काळी विभाग मराठवाड्याच्या दिशेने विस्तारत असल्याचे स्पष्ट चित्र आहे. राज्य पातळीवर जलसिंचनांची पातळी वाढवण्यासाठी पुरेसे प्रयत्न करण्यात येत असले तरी, तापमान वाढ रोखण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले जात नसल्याची खंत आहे. खरंतर हा जागतिक प्रश्‍न असल्यामुळे जागतिक स्तरावर याकडे गांभीर्याने बघितले जात नाही. मात्र कॉप-29 आशेचा किरण आहे. यातून ठोस कृती कार्यक्रम आखण्यात येवून त्याची अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा व्यक्त करूयात !

COMMENTS