Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात लिपिक टंकलेखक, कर सहाय्यक उमेदवारांचे आंदोलन

पुणे/प्रतिनिधी ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फेत लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक पदासाठी पूर्व व मुख्य परीक्षा विद्यार्थ्यांनी पास केली आहे. मात्र,

मोहा ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात
महाविकास आघाडीतील वितंडवाद
कर्जतमधील ६ दुकाने सील नगरपंचायतची धडक कारवाई ; व्यवसायिक संतप्त

पुणे/प्रतिनिधी ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फेत लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक पदासाठी पूर्व व मुख्य परीक्षा विद्यार्थ्यांनी पास केली आहे. मात्र, त्यानंतर टायपिंगची कौशल्य चाचणी पात्र होणे बंधनकारक असून त्याकरिता संबधित परीक्षा घेण्यासाठी टीएसीएस कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, परीक्षा घेण्यात कंपनीला तांत्रिक अडचणी येत असून कौशल्य चाचणीच्या परीक्षेचे निकष आयोग्य पध्दतीचे असून त्यात बदल करण्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी पुण्यातील काँग्रेस भवन येथे मंगळवारी आंदोलन केले.
बालगंधर्व रंगमंदिर याठिकाणी संबंधित आंदोलन करण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी केला होता. परंतु डेक्कन पोलिसांनी सदर आंदोलनास परवानगी नाकारात, काँग्रेसचे युवा नेते बळीराम डोळे यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी सांगितले की, लिपिक टंकलेखक पदाचे एकूण 1180 तर कर सहाय्यक पदाचे 281 जागांसाठी पूर्व व मुख्य परीक्षा मागील वर्षी पार पडलेली आहे. त्यानंतर कौशल्य चाचणी सात एप्रिल रोजी होईल असे सांगत नवीन निकष दिले. पूर्वी सात मिनिटात 120 शब्द मराठी व इंग्रजी टायपिंगसाठी दिले जात असत. परंतु नवीन नियमाने दहा मिनिटात 300 शब्द मर्यादा दिली गेल्याने विद्यार्थ्यांना वेळेत संबंधित मर्यादा पूर्ण करणे अशक्य होत आहे. त्यातच पहिल्या कौशल्य चाचणीत अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी आल्यामुळे आयोगाने सदर चाचणी रद्द केली. त्यानंतर पुन्हा 31 मे रोजी कौशल्य चाचणी घेण्याचे जाहीर केले. मात्र, या परीक्षेत तृटी असल्याने मुलांचे अडचणीत भर पडली आहे. आयोगाने टायपिंगचा उतारा खूप मोठा दिला. किबोर्ड दुसारच देण्यात आला, अ‍ॅटो स्क्रोल उतारा बंद केला गेल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडून वेळ वाया गेला. काहींचे कीबोर्ड मध्येच बंद पडले. त्यांना परत एकदा लॉगिन करुन देणे गरजेचे असताना ते करु दिले नाही. टायपिंगचे किबोर्ड वेगवेगळे होते, तक्रारी करुनही किबोर्ड बदलून दिला जात नव्हता. कौशल्य निकष पात्रते पुरतेच असताना देखील पात्रता निकष 93 टक्के ठेवले गेल्याने ते पात्र करणे अशक्य होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कौशल्य पात्रता निकष राज्यसेवा परीक्षेच्या सी-सॅट प्रमाणे 33 टक्के इतके कमी रावे अशी मागणी केली आहे.

COMMENTS