Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वच्छता अभियानांतर्गत आंब्रळ टेबललँड पठारावर स्वच्छता मोहीम

पाचगणी / वार्ताहर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज आंब्रळ (ता. महाबळेश्‍वर) येथीलपाचगणी : राष्ट्रपिता महात्मा गांधी

सहा महिन्यापासून वैद्यकीय अधिकारी वेतनापासून वंचित
स्वप्न पडले म्हणून कोणी मुख्यमंत्री होत नाही : ना. अजित पवार
वीरनारी शेतकरी उत्पादन कंपनीला भारतीय सेनेचे बहुमूल्य योगदान

पाचगणी / वार्ताहर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज आंब्रळ (ता. महाबळेश्‍वर) येथील
पाचगणी : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज आंब्रळ (ता. महाबळेश्‍वर) येथील टेबललँड पठारावरील स्वच्छता अभियानांतर्गत तलाव परिसर व पठारावर पाचगणी रोटरी क्लब, मैत्री फाऊंडेशन, धनंजय फूड्स, महाबळेश्‍वर वनविभाग आणि आंब्रळ ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम राबविण्यात आल्याने पठाराने मोकळा श्‍वास घेत पर्यटकांकरीता सज्ज झाले आहे.
गांधी जयंतीचे निमित्त साधून उपक्रम ’सुंदर महाराष्ट्र, सुंदर भारत’ बनविण्यासाठी राबविण्यात येत असेलल्या ’एक तारीख, एक तास स्वच्छता’ मोहिमेंतर्गत आंब्रळ पठारावरील तलाव परिसरात गणेश विसर्जनामुळे पसरलेले निर्माल्य, पठारावरील प्लास्टिक कचरा, पाण्याच्या बाटल्या, काचेच्या बाटल्या इत्यादी कचरा सामाजिक संस्थांच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन एकत्र गोळा केला. हा सर्व कचरा खिंगर ग्रामपंचायतीने आपल्या व्यवस्थेमार्फत कचरा संकलन केंद्रावर पोचवला.
बिल्लीमोरिया हायस्कूल यांच्या विद्यार्थ्यांनी देखील या मोहिमेत सहभागी होऊन पाचगणी खिंगर रस्त्याच्या दुतर्फा असलेला कचरा उचलून आपल्या कृतीमधून समाजाला स्वच्छतेचा संदेश दिला. सर्व विद्यार्थी अत्यंत आत्मियतेने स्वच्छतेच्या कार्यास हातभार लावत होते. पाचगणी परिसरातील पठारे ही परिसराची शान यावेळी बोलताना पाचगणी रोटरी क्लबचे अध्यक्ष स्वप्निल परदेशी म्हणाले, पाचगणी परिसरातील पठारे ही आपल्या परिसराची शान असून, त्यांची स्वच्छता राखणे हे पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून पाचगणीतील सामाजिक संस्थांनी राबविलेली स्वच्छता मोहीम ही खरोखरच कौतुकास्पद आहे.
पाचगणी परिसरातील पठारे आणि इथला निसर्ग जर स्वच्छ राहिला तरच इथले सौंदर्य टिकून राहील. अन्यथा पर्यटक इकडे पाठ फिरवतील. त्यामुळे स्वच्छता गरजेची असल्याचे मत मैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन भिलारे यांनी व्यक्त केले.

COMMENTS