Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव शहरात हप्ता वसुलीतून हाणामारी ? कोपरगावात गुन्हा

कोपरगाव ः कोपरगाव शहरात मंगळवारी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास भाजीपाला विक्रेते फिर्यादी नयन संजय मेहरे (वय-27) यांस याच शहरातील आरोपी अझर शेख, र

“अपने 2′ ला संगीत देणार हिमेश रेशमिया l पहा LokNews24
बेलापूरात महिलांचे पोलीस बांधवांसमवेत अनोखे रक्षाबंधन l LokNews24
मिनानाथ पांडे यांच्या निधनाने संघर्ष करणारे नेतृत्व हरपले ः भुजबळ

कोपरगाव ः कोपरगाव शहरात मंगळवारी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास भाजीपाला विक्रेते फिर्यादी नयन संजय मेहरे (वय-27) यांस याच शहरातील आरोपी अझर शेख, राजू डगळे, इरफान शेख, फौजल सय्यद आदीसंह अन्य दोन ते तीन आरोपींनी बस स्थानकाशेजारी असलेल्या पायल फूट वेअर या जवळ मागील भांडणाचा वाद उकरून काढून लाकडी दांडक्याने व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात सहा-सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी हा गुन्हा हप्ता वसुलीवरून झाला असल्याची विश्‍वसनीय माहिती आहे.
   कोपरगाव शहर आणि उपनगरे अलीकडील काळात संवेदनशील बनली असून तेथील तरुणात त्यात वारंवार भांडणे,हाणामार्‍या आदी गुन्हे दाखल होत असून शहरात शांतता भंग होण्याच्या घटना वारंवार घडताना दिसत आहे.त्यात सुभाष नगर,गांधीनगर,हनुमाननगर,खडकी आदी ठिकाणे तर कायम अशांतता निर्माण करत असून कायदा सुव्यवस्था निर्माण करताना दिसत आहे.यातील शहरात जवळपास 180 ठिकाणी मटका एजंट कार्यरत असून त्यांचा मुख्य अड्डाप्रमुख हा धारणगाव रस्ता जेऊर पाटोदा हद्दीत बालाजीनगर येथे कार्यरत असल्याची माहिती आहे.यात अवैध दारू अड्डे वेगळे आहेत.यातील गुन्हेगारांचे हप्ते पोलीस अधिकार्‍यांसह,राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांचे पर्यंत सोयीस्कर रित्या पोहचत असल्याची माहिती आहे. कोपरगाव बस स्थानकाच्या दक्षिणेस तर बकाल आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांचा अड्डा बनला आहे.त्यामुळे महिला आणि तरुणींना त्या ठिकाणाहून चालणे अशक्य बनले आहे.त्यातून अनेक वादविवाद निर्माण होत आहे.अशाच घटना काल सोमवार दि.17 जून रोजी दुपारी 4.30 वाजता घडली असून यातील आरोपी अझर शेख,राजू डगळे,इरफान शेख,फौजल सय्यद आदीसंह अन्य दोन ते तीन आरोपींनी बस स्थानका शेजारी असलेल्या,’पायल फूटवेअर’ च्या जवळ मागील भांडणाचा वाद उकरून काढून लाकडी दांडक्याने व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात सहा-सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे सामान्य नागरिकांत खळबळ उडाली आहे. या प्रकरणी फिर्यादी नयन मेहरे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन वरील सहा ते सात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचेसह पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांनी भेट दिली आहे. दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम 326,324,143,147,148,323,504,506 प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी दरम्यान पुढील तपास पोलीस निरीक्षक देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.डी.आर.तिकोणे हे करीत आहेत. दरम्यान या घटनेत खरी घटना दडविण्यात आल्याची विश्‍वसनीय माहिती असून आरोपींनी फिर्यादीकडे हप्ता गोळा करण्याचे काम केले असल्याचे समजते. सदर 01 हजार 400 रक्कम घेऊन जाऊन पुन्हा ते घटनास्थळी मद्यधुंद अवस्थेत जाऊन दमबाजी केल्याने हा गंभीर प्रकार घडला असल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती आहे. या प्रकरणी शहर शिवसेनेचे माजी शहर प्रमुख भरत मोरे व युवा सेनेचे कार्यकर्ते आदींनी पोलीस ठाण्यात निवेदन सुभाषनगर उपनगर हा अवैध अड्ड्यांचे माहेरघर बनले असल्याचा आरोप करून त्यामुळे शहरातील शांती भंग पावत असल्याचा आरोप करून अधिकार्‍यांनी कठोर कारवाई करून शहरातील अवैध व्यवसाय बंद करावे अशी मागणी केली आहे.

COMMENTS