मास्को/वृत्तसंस्था ः रशियाच्या सत्ताकारणात सर्वशक्तिमान असणारे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याविरोधात बंड पुकारण्यात आले आहे. हे बंड पुतीन या

मास्को/वृत्तसंस्था ः रशियाच्या सत्ताकारणात सर्वशक्तिमान असणारे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याविरोधात बंड पुकारण्यात आले आहे. हे बंड पुतीन यांचे निकटवर्तीय येवगेनी प्रिगोझिन यांनी पुकारले आहे. प्रिगोझिन यांच्या खासगी सैन्याने रशियन सैन्याविरोधात आघाडी उघडली आहे. येवगेनी प्रिगोझिन यांच्या वॅगनर या खासगी सैन्याने रशियाच्या तीन शहरांवर ताबा मिळवला असल्याचा दावा केला आहे. रशिया युक्रेन युद्धात अपयशी ठरल्याची भावना या वॅगनर सैनिकांत असून, त्यामुळेच या सैनिकांनी बंड पुकारले आहे.
बंडाच्या ठिणगीमुळे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पुतीन यांच्या खासगी मिलिशिया वॅगनर ग्रुपने बंड केले आहे. वॅगनर ग्रुप आणि रशियन सैनिक यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला आहे. मॉस्कोमध्ये रणगाडे तैनात करण्यात आले आहेत. वॅगनर ग्रुपने बंड केल्यामुळे रशियात सत्तापालट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार युक्रेनमध्ये असलेल्या वॅगनर प्रशिक्षण शिबीरावर क्षेपणास्त्र हल्ला झाला होता. या हल्ल्यासाठी वॅगनर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांनी रशियन सैन्याला जबाबदार धरले आहे. या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये वॅगनरचे अनेक सैनिक मारले गेले होते. त्यामुळे वॅगनर ग्रुप प्रचंड आक्रमक झाला आहे. वॅगनरने बंडखोरी केल्यामुळे रशियावर मोठे संकट आले असून सत्तापालटाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वॅगनर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांनी याबाबत बोलताना म्हटले की, आमच्या सैनिकांनी दक्षिण सीमा क्षेत्रात प्रवेश केला आहे. आम्ही दक्षिणेकडील अनेक सैनिकांची प्रमुख केंद्र आणि जिल्हा प्रशासनाच्या इमारती ताब्यात घेतल्या आहेत. आमचे 25 हजार सैन्य या लढाईसाठी पूर्णपणे तयार असून ते बलिदानासाठी तयार आहेत. वॅगनर ग्रुपच्या बंडामुळे रशियातील वातावरण बिघडले असून, नागरिकांनी आपल्या घरातच राहावे बाहेर पडू नये असे आवाहन रशियन प्रशासकीय अधिकार्यांकडून करण्यात येत आहे.
सैन्याचे मुख्यालय घेतले ताब्यात – रशियातील प्रायव्हेट मिलिटरी असलेल्या वॅगनर गटाने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधात बंड पुकारले आहे. रशियन सैन्याचे मुख्यालय ताब्यात घेतल्याचा दावा वॅगनर गटाचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांनी केला आहे. दरम्यान, रशियामध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. इंटरनेटवर निर्बंध घालण्यात आले आहेत आणि मॉस्कोच्या रस्त्यावर लष्करी हालचाली वाढल्या आहेत. दरम्यान, रशियाने प्रिगोझिन यांच्या अटकेचे आदेश दिले आहेत. शनिवारी सकाळी पहाटे वॅगनर गटाचे सैन्य रशियातील रोस्तोव-ऑन-डॉन शहरात दाखल झाल्याचे व्हिडिओ समोर आले. एका व्हिडिओमध्ये पोलिस मुख्यालयाच्या सभोवतालच्या परिसरात सशस्त्र सैन्यांचा ताफा दिसून आला. यामुळे मास्कोतून रशियन सैन्याला सतर्कतेचे आदेश दिले आहेत.
युक्रेन युद्धात अपयशी ठरल्याचा आरोप – प्रिगोझिन यांनी रशियाच्या लष्करातील उच्चपदस्थ नेत्यांवर युक्रेनमधील युद्धात अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. प्रिगोझिन यांनी शुक्रवारी काही प्रक्षोभक व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग सार्वजनिक केले होते. ज्यामध्ये त्यांनी रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगू यांच्यावर युक्रेनमधील वॅगनरच्या फील्ड कॅम्पवर रॉकेट हल्ल्याचा आदेश दिल्याचा आरोप केला आहे. जिथे त्यांचे सैन्य रशियाच्या बाजून लढत आहे.
COMMENTS