Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पावसाअभावी शहराच्या पाण्याची कपात!

लातूर प्रतिनिधी - लातूर शहरासह बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध 21 पाणीपुरवठा योजनांना पाणीपूरवठा होणार्‍या केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा

नाशिकची अश्लीलता चव्हाट्यावर ! कॉफी शॉप मध्ये तरुण तरुणींना प्रायव्हसी 
‘अहिंसा व विश्वशांतीसाठी भारताला सामर्थ्यवान बनवावे लागेल’ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गेले अण्णा हजारेंच्या भेटीला…

लातूर प्रतिनिधी – लातूर शहरासह बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध 21 पाणीपुरवठा योजनांना पाणीपूरवठा होणार्‍या केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणाची वाटचाल आता मृत पाणीसाठ्याकडे होत आहे. पावसाअभावी धरणात नव्याने पाण्याचा येवा झालेला नाही. मांजरा धरणात सध्या 45.880 दशलक्षघनमीटर म्हणजेच 24.23 टक्के पाणीसाठा आहे. पावसाचा खंड, बाष्पीभवनासह धरणातील पाण्याचा उपसा याबाबींचा विचा केला तर सद्यस्थितीत उपलब्ध असलेले पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षीत करुन ते पाणी जास्तीत जास्त दिवस कसे पुरविता येईल, याचा विचार केला जात असून येत्या 1 सप्टेंबरपासून लातूर शहराच्या पाण्याची कपात केली जाण्याची शक्यता आहे.
लातूर, बीड व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांसाठी महत्वपूर्ण असलेल्या मांजरा धरणावर लातूरसह 21 विविध पाणीपुरवठा योजना अवलंबुन आहेत. मांजरा धरणात आजघडीला 45.880 दशलक्षघनमीटर जिवंत पाणीसाठा आहे. यातील 20 टक्के पाणी मागील पावसाळ्यातील आहे तर केवळ 4 टक्के पाणीसाठा या पावसाळ्यातील आहे. या धरणावर अवलंबुन असलेल्या 21 पाणीपुरवठा योजनांना दर महिन्याला 2 दशलक्षघनमीटर पाणी लागते तर 5 दशलक्षघनमीटर पाण्याचे दर महिन्याला बाष्पीभवन होते. म्हणजेच दर महिन्याला मांजरा धरणातून 7 दशलक्षघनमीटर पाणी संपते. पिण्यापेक्षा बाष्पीभवनातूनच जास्त पाणी संपते. यंदा पावसाळ्यामध्ये मांजरा धरणात 14 दशलक्षघनमीटर नवी पाणी आले आहे. सुरुवातीला थोडा पाऊस पडला होता. त्यात नवीन पाण्याची वाढ झाली होती. गेल्या महिन्यापासून पाऊस नाही. त्यामुळे सध्या धरणात पाण्याचा येवा नाही. यंदा पावसाने कमालीची ओढ दिली आहे. पावसाअभावी खरिपातील पिकांसोबत जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. पिकांचे मोठे नुकसान झाले. विमा कंपनीकडून शेतक-यांना आगाऊ भरपाई देण्याचे नियोजन प्रशासन करीत आहे. यासाठी पिकांचा मिडसिझन सर्वे करण्याचे आदेश दिले असून कृषी विभाग आणि विमा कंपनीकडून पिकांचा संयुक्त सर्वे सुरु आहे. दुसरीकडे पावसाने ओढ दिल्याचा परिणाम पाणी योजना असलेल्या प्रकल्पांवर होत आहेत.

COMMENTS