अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य वरिष्ठ तायक्वांदो स्पर्धेत नगरच्या स्वप्नाली शिंदे व स्वप्नाली घेमुड यांनी सुवर्णपदके पटकाविले. पुण्याच्या खेळ
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य वरिष्ठ तायक्वांदो स्पर्धेत नगरच्या स्वप्नाली शिंदे व स्वप्नाली घेमुड यांनी सुवर्णपदके पटकाविले. पुण्याच्या खेळाडूंनी सर्वाधिक सुवर्णपदके जिंकत विजेतेपद पटकाविले. तर, प्रतिक्षा देवरे हिने रौप्य मिळविले. या स्पर्धा पालघर येथे पार पडल्या. तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या मान्यतेने पालघर तायक्वांदो असोसिएशन आयोजित महाराष्ट्र राज्य वरिष्ठ तायक्वांदो स्पर्धा पार पडली. स्पधेंचे उद्घाटन बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी व्यासपीठावर राज्यसंघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिल झोडगे, महासचिव संदीप ओंबासे, सचिव मिलिंद पठारे, कोषाध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, तांत्रिक समितीचे अध्यक्ष प्रवीण बोरसे, सुभाष पाटील, भास्कर करकेरा, गफार पठाण, वेंकटेश कररा, धुलीचंद मेश्राम, सुरेश चौधरी आदी उपस्थितीत होते.
पहिल्या दिवशी पुमसेत सर्वाधिक सुवर्णपदकासह मुंबई संघाने प्रथमस्थान मिळवले. यजमान पालघर संघाला द्वितीय, तर मुंबई उपनगरला तिसरे स्थान मिळाले. क्योरोगी (फाईट) प्रकारात सर्वाधिकपदकांसह पुणे जिल्ह्याने विजेतेपद पटकावले. मुंबई संघाला उपविजेतेपद तर, सांगलीला तिसरे स्थान मिळाले. नगरच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी करत दोन सुवर्ण पटकाविले, तर एक रौप्यपदक पटकाविले. सुवर्णपदक विजेत्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
इंडिया तायक्वांदोचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष डॉ. एकनाथ मुंडे, सचिव संतोष बारगजे, सहसचिव अलताफ कडकाले, शंकर जेधे, र्ेंदिनेशसिंग राजपूत, सुरेश वाघ, शकील सय्यद, ब्रम्हचैतन्न राजगुरू, घनश्याम सानप, नारायण कराळे, महेश मुरादे, गोरक्षनाथ गालम, अंबादास साठे, बाबासाहेब क्षीरसागर, लक्ष्मण शिंदे, महादेव मगर, गणेश वंजारी आदींनी अभिनंदन केले.
राज्यस्तरीय स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते मुले : निलेश पाटील (जळगाव), नीरज चौधरी (धुळे), शिवम शेट्टी, श्रीतेज झगडे, सुरज चव्हाण, विशाल लामखडे व गौरव कुडले (पुणे), गौरव भट (सांगली) मुली : स्वप्नाली घेमुंड व स्वप्नाली शिंदे (अहमदनगर), मृणाल वैद्य, निशिता कोतवाल, शिवानी भिलारे, रुचिका भावे व ऐश्वर्या रावडे (पुणे), श्रेया जाधव (मुंबई).
COMMENTS