Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शहर काँग्रेसची सातपुतेंना साथ व कर्डिले-जगतापांवर टीकास्त्र

केडगाव दगडफेक प्रकरण

अहमदनगर/प्रतिनिधी ः नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथील वाद व त्यानंतर भूषणनगर (केडगाव) येथे झालेली दगडफेक आणि यानिमित्ताने ओंकार सातपुते व अक

दुधाच्या 30 रूपये दरावर शिक्कामोर्तब
श्रीगोंद्यात औद्योगिक वसाहतीची निर्मिती करा : उद्योगमंत्र्यांकडे मागणी
सिद्धार्थ किसन चव्हाण यांची वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयात पेटंट ऑफिसर म्हणून निवड

अहमदनगर/प्रतिनिधी ः नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथील वाद व त्यानंतर भूषणनगर (केडगाव) येथे झालेली दगडफेक आणि यानिमित्ताने ओंकार सातपुते व अक्षय कर्डिले या युवा नेत्यांमध्ये झालेल्या संघर्षात नगर शहर काँग्रेसनेही आता उडी घेतली आहे. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी सातपुतेंची पाठराखण करताना कर्डिलेंना व अप्रत्यक्षपणे आ. जगतापांना टीकेचे लक्ष्य करताना हिंमत असेल तर समोर येऊन लढण्याचे आव्हानही दिले आहे.
राहुरीचे भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांचे चिरंजीव ओंकार सातपुते यांच्यात मंगळवारी पिंपऴगाव लांडगा येथे एका लग्न समारंभात वाद झाले व हाणामारीही झाली. त्यानंतर याच दिवशी सायंकाळी भूषणनगर येथील सातपुतेंच्या हॉटेलवर दगडफेक झाली. या दोन्ही घटनांबाबत नगर तालुका पोलिस ठाणे व कोतवाली पोलिस ठाण्यात अक्षय कर्डिले व ओंकार सातपुतेंसह त्यांच्या समर्थकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर, या प्रकरणाच्या निमित्ताने शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष किरण काळे यांनी सातपुतेंना अप्रत्यक्ष साथ देताना कर्डिले व जगतापांवर टीकास्त्र सोडले आहे.

हिंमत असेल तर लढा – यासंदर्भात काळे यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, केडगावमध्ये दहशत करण्याचे काम सोयर्‍या-धायर्‍यांच्या गुंडांच्या टोळीने केले. कट रचून दगडफेक केली. त्यांनी हिंमत असेल तर समोर येऊन लढावे. मग यांना दाखवू कुणात किती दम आहे ते, असे म्हणत काळे यांनी केडगाव प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर आव्हान दिले आहे. कोतवाली पोलिस स्टेशन हद्दीत संजय झिंजे भ्याड हल्ला प्रकरणानंतर लगेचच घडलेली ही दुसरी मोठी घटना आहे. पोलिसांनी यांना आवर घालावा, नाही तर आता जनताच रस्त्यावर उतरत एल्गार करेल, असा इशारा काळे यांनी दिला आहे.
याबाबत त्यांनी पुढे सांगितले की, भूषणनगर येथे दगड़फेकीची घटना घडली, त्या रात्री काळे यांच्यासह काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष मनोज गुंदेचा, अल्पसंख्यांक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, युवक जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते पाटील यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये उपस्थित होते. यावेळी गुन्हा दाखल करून घेताना पोलिसांनी विनाकारण वेळ लावला. प्रतिसाद दिला नाही. नगरसेवक अमोल येवले यांना पोलिसांच्या चुकीच्या भूमिकेमुळे रात्रभर ठिय्या मांडावा लागला. पहाटेपर्यंत हा सगळा प्रकार सुरू होता, असे काळे यांनी म्हटले आहे. त्यांनी हिंमत असेल तर समोर येऊन लढावे, मग दाखवू, असे आव्हान देताना केडगाव दगडफेक दहशत माजवण्यासाठी असून, पोलिसांनी यांना आवर घालावा, अशी मागणीही त्यांनी केली. आजही हा महाराष्ट्रातील जनता अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक हल्ला प्रकरण विसरलेली नाही. ज्या शहरात पोलिसच असुरक्षित आहेत तिथे मायबाप जनता कशी सुरक्षित राहू शकते? केडगावमध्ये गुंडांच्या टोळीने धुडगूस घालत घातलेला हैदोस हा यांच्या राजकीय गुंडगिरीचा भाग आहे. घडलेला प्रकार अत्यंत गंभीर स्वरुपाचा असून गुंडगिरीच्या जीवावर राजकारण करीत त्यांचे समाजाला वेठीस धरण्याचे काम सुरू असल्याचा आरोप काळे यांनी केला आहे. काळे म्हणाले की, ओंकार सातपुते लढवय्या कार्यकर्ता आहे. संपूर्ण काँग्रेस त्याच्यामागे आहे. त्याच्यावर खोटेनाटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खोटे गुन्हे दाखल करण्यातच या सोयर्‍या-धायर्‍यांना मर्दानगी वाटते. यांच्या दुष्कृत्यांचा पापाचा घडा भरत आला आहे. येथून पुढे कुणी दहशत करीत अंगावर येण्याचा प्रयत्न केला तर त्याला शिंगावर घेऊन आपटायचे काम केले जाईल, असा इशाराही काळे यांनी काँग्रेसच्यावतीने केडगाव प्रकरणावरून दिला आहे.

COMMENTS