Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागरिकांनी आपले आधार कार्ड अद्ययावत करून घ्यावे : जिल्हाधिकारी

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील ज्या नागरिकांची आधार कार्ड तयार होऊन दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. अशा नागरिकांनी आपल्या आधार अद्ययावत करून घ

महावितरणच्या अथक प्रयत्नांना यश; कृषिपंपांना 8 तास सुरळीत वीजपुरवठा
Beed : महावितरणचा गलथान कारभार तार तुटून दोन एकर ऊस जळुन खाक ! (Video)
तीन लाखांपर्यंतच्या अल्प मुदतीच्या कृषी कर्जावर वार्षिक 1.5 टक्के व्याज सवलतीला मंजुरी

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील ज्या नागरिकांची आधार कार्ड तयार होऊन दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. अशा नागरिकांनी आपल्या आधार अद्ययावत करून घेणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आधार कार्ड अद्ययावत करण्यासाठी शिबिरांचे आयोजन केले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली.
आधार अद्ययावतीकरण मोहिम वेगवान करण्यासाठी जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, विशेष कार्यकारी दंडाधिकारी आढावा घेत आहेत. प्रशासनामार्फत वितरीत केलेल्या 93 आणि महिला व बालविकास विभागाच्या 56 आधार केंद्र चालकांचा आढावा घेण्यात आला आहे. त्यांना शिबिरांचे आयोजन करण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. आधार कार्ड काढल्यानंतर कालांतराने त्यामध्ये अनेक बदल होतात जसे पत्ता, नागरिकांचे बोटांची ठसे, नावामध्ये दुरुस्त्या, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी इ. भारतीय विशेष ओळख प्राधिकरण यांनी अपडेट डॉक्युमेंट नावाची नवीन सुविधा तयार केली असून माय आधार या अ‍ॅपवर अथवा ुुु.ाूररवहरीर्.ीळवरळ.र्सेीं.ळप या संकेत स्थळावर जाऊनही आधार डॉक्युमेंट अपडेट करू शकतात.

COMMENTS