नांदेड प्रतिनिधी - नांदेडच्या कंधार तालुक्यातल्या पेठवडज जवळ खुले आम अवैध दारूची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. गेल्या अनेक दिवसापासून अवैध र

नांदेड प्रतिनिधी – नांदेडच्या कंधार तालुक्यातल्या पेठवडज जवळ खुले आम अवैध दारूची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. गेल्या अनेक दिवसापासून अवैध रित्या ही दारू विक्री होत आहे. ही दारू विक्री बंद करण्यात यावी. या मागणीसाठी तक्रारी निवेदन देऊनही दारूबंदी अधिकाऱ्यांनी या बाबत कुठलीही दखल घेतली नसल्याने पेठवडजच्या ग्रामस्थांनी दारूबंदी अधिकाऱ्याला घेराव घातला आहे. यावेळी पेठवडज येथील महिला व पुरुष सहभागी झाले होते. पेठवडज येथील अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी,अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
COMMENTS