Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ख्रिसमसचा देशभरात जल्लोष

पर्यटनस्थळांवर नागरिकांची गर्दी

मुंबई/प्रतिनिधी ः जगभरात रविवारी ख्रिसमसचा सण मोठया जल्लोषात साजरा झाला. कोरोनाचे कोणतेही निर्बंध नसल्यामुळे ख्रिसमसचा जल्लोष सगळीकडे बघायला मिळ

अनन्या पांडेचा नवा प्रमोशन फंडा.
म्युकरमायकोसीच्या रुग्णांना मोठा दिलासा ; खासगी रुग्णालयांना उपचारांसाठी अवाजवी दर आकारता येणार नाही
पुण्यात माजी नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या

मुंबई/प्रतिनिधी ः जगभरात रविवारी ख्रिसमसचा सण मोठया जल्लोषात साजरा झाला. कोरोनाचे कोणतेही निर्बंध नसल्यामुळे ख्रिसमसचा जल्लोष सगळीकडे बघायला मिळाला. ख्रिसमस आणि लाँग विकेंडनिमित्त साधून देशभरातील पर्यटक विविध पर्यटनस्थळांवर गर्दी करतांना दिसून येत आहे. महाराष्ट्रात देखील रविवारी सर्वत्र ख्रिसमसचा उत्सव पाहायला मिळत आहे. ख्रिसमस निमित्त पुण्यातील खाजगी शाळेचा अभिनव उपक्रम राबवला आहे. येथे शिक्षक-शिक्षिका संताक्लॉज बनून विद्यार्थ्यांच्या घरी पोहोचले. यावेळी विद्यार्थ्यांना शाळेकडून भेट वस्तू ही देण्यात आल्या.

आपले शिक्षक-शिक्षिका घरी आलेले पाहून बच्चे कंपनी सुद्धा खुश झाल्याचे पाहायला मिळालेे आहे. शाळेच्या या नावीन्य पूर्ण उपक्रमाचे पालक वर्गातून कौतुक करण्यात आले आहे. त्याचबरोबर साईबाबांच्या शिर्डीतही भाविकांनी मोठी गर्दी केली असून ख्रिसमसचा उत्साह शिर्डीतही बघायला मिळतोय. नाताळ आणी रविवारच्या सुट्टीमुळे साईनगरी भक्तांच्या गर्दीने हाऊसफुल झाली आहे. सकाळपासूनच भाविकांच्या गर्दीने दर्शनरांगा फुलून गेल्या असून साईमंदिरही आकर्षक फुलांनी आणी विद्यूत रोषणाईने सजविण्यात आले आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोरोना नियम पाळण्याचे आवाहन साईबाबा संस्थानने भाविकांना केले आहे. ख्रिसमस आणि न्यूइअर मुळे ताडोबा व्याघ्रप्रकल्प पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेले. पर्यटकांच्या गर्दी मुळे व्याघ्र प्रकल्पातील 112 गाड्यांची ऑन-लाईन बुकिंग तर फुल झालीच आहे. पण स्पॉट बुकिंगसाठी उपलब्ध असलेले ताडोबातील 4 कॅन्टर, मिनीबस, तखझ कोट्यातील गाड्या आणि बफर क्षेत्रातल्या सर्व जिप्सी पण हाउसफुल झाले आहेत. मुख्य म्हणजे या वर्षी नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे अनेक मंत्री, आमदार आणि अधिकारी टायगर सफारी साठी ताडोबात दाखल झाले आहेत. त्यामुळे ख्रिसमस आणि न्यूयेअरच्या सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी आलेल्या पर्यटकांमुळे ताडोबात चैतन्य निर्माण झाले आहे.

COMMENTS