Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोवरचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी चोपडा नगरपालिका ॲक्शन मोड वरती

जळगाव प्रतिनिधी- राज्यामध्ये गोवर रुग्णांनी डोकं वर काढलेलं असल्याने  वैद्यकीय यंत्रणा व स्थानिक प्रशासन  नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करीत आ

पोलिसांच्या निवडणुकीत चक्क जय श्रीराम पॅनेल
अल्पवयीन मुलाने गाडी चालवत वाहनांना उडवले
बुलढाण्यातील माती पाणी परीक्षण प्रयोगशाळा राज्यातून प्रथम

जळगाव प्रतिनिधी– राज्यामध्ये गोवर रुग्णांनी डोकं वर काढलेलं असल्याने  वैद्यकीय यंत्रणा व स्थानिक प्रशासन  नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे चोपड्यात देखील  गोवरचे रुग्ण आढळू लागले असल्याने नगरपालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आलेले आहे आज नगर परिषदेच्या सभागृहामध्ये मुख्याधिकारी हेमंत निकम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलवण्यात आले यावेळी नगरपरिषदेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चंद्रकांत बारेला यांनी आशा वर्कर व उपस्थित असलेले कर्मचारी व वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर यांच्याशी गोवर रुग्णांचे संख्या वाढु नये व प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाययोजना केले पाहिजे आणि काय काळजी घेतली पाहिजे यासाठी सविस्तर मार्गदर्शन केलं. 

याबद्दल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हेमंत निकम यांनी सांगितले की चोपडा शहरांमध्ये गोवरचे रुग्ण आढळू लागले असल्याने   हा आजार 9 महिन्यापासून ते 9 वर्षापर्यंतचे मुलांमध्ये आढळून येतो. गोवर रुग्णांचे लक्षणे  दिसून आल्याने  तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र नगरपरिषद रुग्णालय तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा व गोवर आजारावरील लसीकरण करून घ्यावे विटामिन ए च्या डोस देखील बाळाला द्यावा जेणेकरून आपला बाळ या आजारातून बाहेर पडेल आज झालेल्या मीटिंगमध्ये आशा वर्कर यांना सर्व शहरात सर्वे करण्याचे आदेश दिलेले आहे ज्या ठिकाणी रुग्ण आढळतात त्यांना आरोग्य केंद्र मार्फत डोस देण्याचे काम सुरू केलेले  असल्याचे मुख्य अधिकारी हेमंत निकम यांनी सांगितले. 

COMMENTS