Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चिमणी दिनानिमित्त मुक्तांगणच्या प्रांगणात घरटी बनविताना चिव-चिवाट

इस्लामपूर / प्रतिनिधी : चिऊ-चिऊ चिमणी. गाते गाणी.. पिते पाणी …चिमणी चिमणी पाणी दे.. ही गाणी लहानपणी बाल शाळेत मुलांच्या कानांवर पडतात. मुलांसाठी

’जरंडेश्‍वर ईडीच्या ताब्यात असताना कारखान्याला नोटीस
राजारामबापू दूध संघाच्या अध्यक्षपदी नेताजीराव पाटील बिनविरोध
लातूर जिल्ह्यातील अवकाळी नुकसानीचे पंचनामे पूर्ण; आता मदत केव्हा मिळणार?

इस्लामपूर / प्रतिनिधी : चिऊ-चिऊ चिमणी. गाते गाणी.. पिते पाणी …चिमणी चिमणी पाणी दे.. ही गाणी लहानपणी बाल शाळेत मुलांच्या कानांवर पडतात. मुलांसाठी चिमण्या आकर्षण असतात. या चिमण्यांची घरे कशी असतात? याची उत्सुकता असतेचं. ती कमी करताना आणि चिऊताईसाठी हक्काची घरे बनव्यासाठी पालकांनी इस्लामपुरातील मुक्तांगण प्ले स्कूलच्या आवारात गर्दी केली होती.
निमित्त होते चिमणी दिनाचे…! घरटे बनवण्याची अनोखी स्पर्धा घेण्यात आली. पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. टाकाऊ वस्तू पासून सूंदर घरटी बनवण्यात आली आहेत. आईच्या साथीला चिमुकले हात घरटे बनव्यासाठी पुढे आले. कोणी लहान मुलं रंग देत होते. कोणी कागद कापत होते.कोणी तो चिकटवत होते. कोणी घरट्यात ठेवण्यासाठी गवत शोधत होते. आईची कौशल्ये यावेळी पणाला लागली. रिकामी खोकी, पुठ्ठे, कागदी नळ्या, गवत, कापूस, दोरा, सुतळी, लोकर याचा वापर करून विविध आकारातील घरटी बनवली. विविध रंगछटा वापरून घरटी सजवण्यात आली होती. तयार घरटी शाळेच्या आवारात लावण्यात येणार आहेत. चिमणी हा पक्षी सर्व परिचित असा मानवी वसाहतीजवळ आढळणारा छोटा पक्षी आहे. चिमणीच्या संवर्धनासाठी जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यासारखी चळवळ सुरू आहे. ही चळवळ पुढे नेण्यासाठी स्पर्धा झाली.
चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. घरट्यासाठी जागा नसणे हे सर्वात मोठे कारण आहे. चिमणी सहसा मानवी घराजवळ, वळचणीच्या जागेवर घरटे बांधते. मात्र, आधुनिक प्रकारच्या घरबांधणी पध्दतीमध्ये पक्ष्यांच्या रहिवासासाठी जागाच उपलब्ध नाही. बेफिकीर वृक्षतोडीमुळे चिमण्यांचा घरटे बांधण्यास नैसर्गिक रहिवास व अनुकूल जागांची उपलब्ध कमी झाली आहे. झाडांवर घरटे बांधताना इतर पक्ष्यांशी स्पर्धा करावी लागते. त्यामुळे मुक्तांगणच्या पालकांसाठी स्पर्धा घेत चिमण्यांची घरटी संकलित करण्यात आली आहेत.
सौ. स्वाती गोंदकर, डॉ. स्मिता पाटील, श्‍वेता पाटील, प्रियंका बेकनाळकर, अनुराधा साळोखे, कोमल भिसे, प्रियांका शिंदे, रिया व जय मोहिते वर्षा कांबळे, धनश्री पाटील, भारती उथळे, आरती धोतरे यांनी सहभाग घेतला. संचालिका वर्षाराणी मोहिते यांनी संयोजन केले.

COMMENTS