Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चित्रा वाघ यांनी महिला दिनानिमित्त इगतपुरीतील आदिवासी वाड्यापाड्यांना दिली भेट

नाशिक प्रतिनिधी - जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज इगतपुरी तालुक्यातील धारणोली, डहाळेवाडी,

संघर्ष धान्य बँकेकडून वृद्धाला किराणाची मदत
नाशिक पुणे महामार्गावर गॅस वाहून नेणारा टेम्पो पलटी
अखेर निवडणुकांचा मार्ग मोगळा | DAINIK LOKMNTHAN

नाशिक प्रतिनिधी – जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज इगतपुरी तालुक्यातील धारणोली, डहाळेवाडी, खांबाळेवाडी, ठाकूरवाडी, कथरुवांगण, लंगड्याचीवाडी आणि इगतपुरी येथील घाटनदेवी मंदिर परिसरातील आदिवासी वाड्यापाड्यांना भेट दिली. यावेळी केंद्र व राज्य शासनाच्या उज्वला योजना, आयुष्यमान भारत योजना, संजय गांधी निराधार योजना, जलजीवन मिशन, घरकुल योजना, शौचालय योजनासहित विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचत आहे की नाही? याबद्दल विचारपूस केली व महिलाशी संवाद साधला. यावेळी या वाड्या पाड्यातील महिलांनी आपल्या अनेक समस्या चित्रा वाघ यांच्यासमोर मांडल्या. लवकरच मी पुन्हा एकदा आपणा सर्वांची भेट घेऊन आपल्या सर्व समस्या शासन दरबारी मांडून त्याचे लवकरच निराकरण करणार असल्याचे आश्वासन यावेळी चित्रा वाघ यांनी दिले.

COMMENTS