Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उर्फी जावेदविरोधात चित्रा वाघ यांची पोलिसात तक्रार

मुंबई : सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या बोल्ड फॅशनमुळे कायमच चर्चेत असते. विचित्र डेसिंग सेन्समुळे तिला टीकेचाही सामना करावा लागतो. भाजपच

ऑलिम्पिकमध्ये पी. व्ही. सिंधूने पटकावले कांस्यपदक
माजलगाव बा.स.चे सभापती जयदत्त नरवडे तर उपसभापती श्रीहरी मोरे.
अरे ला कारे करत जाब विचारा : रुपालीताई चाकणकर

मुंबई : सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या बोल्ड फॅशनमुळे कायमच चर्चेत असते. विचित्र डेसिंग सेन्समुळे तिला टीकेचाही सामना करावा लागतो. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद वर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी यासाठी मुंबईचे आयुक्त तसेच सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था यांची भेट घेतली.

चित्रा वाघ यांच्या ट्विटवर उर्फीने देखील कमेंट करत आपण माझ्या मुद्देवरुन जनतेची दिशाभूल करत आहात. ज्या महिलांना मदतीची गरज आहे त्यांच्यासाठी तुम्ही प्रत्यक्षात काही का करत नाही? असा उलट सवाल विचारला आहे. तर चित्रा वाघ उर्फीवर चांगल्याच संतापल्या आहेत. उर्फी जावेदला नंगटपणा करणारी बाई म्हणत त्यांनी तिच्या अटकेची मागणी केली आहे. स्त्री देहाचे मुंबईतल्या सार्वजनिक ठिकाणी भररस्त्यातील अत्यंत हीन, किळसवाणे प्रदर्शन भारतीय संस्कृतीच्या, सभ्यतेला कलंक आहे. या अभिनेत्रीने खासगी जीवनात काय करावे याच्याशी समाजाला काहीच देणेघेणे नाही. मात्र केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी या अभिनेत्रीने आपल्या देहाचा मांडलेला बाजार चीड आणणारा आहे. तिला आपल्या देहाचे प्रदर्शन करायचे असेल तर तिने ते चार भिंतीच्या आड जरूर करावे. अशा पद्धतीच्या भावना चेतवणार्‍या कृत्याने समाजातील विकृत मनोवृत्तीला आपण खतपाणी घालत आहोत याची या अभिनेत्रीला जाणीव नसेल. या कृत्याबद्दल सदर अभिनेत्रीवर तातडीने संबंधित कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची मागणी आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तुमच्यासारखे राजकारणी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा बाजूला ठेवतात. आपण माझ्या मुद्देवरुन जनतेची दिशाभूल करत आहात. ज्या महिलांना मदतीची गरज आहे त्यांच्यासाठी तुम्ही प्रत्यक्षात काही का करत नाही? महिला शिक्षण, बलात्काराची लाखो प्रलंबित प्रकरणे हे मुद्दे आहेत. आज राजकारण्यांना पाहून वाईट वाटते. लोकांच्या नजरेत येण्यासाठी मला लक्ष्य करत आहे. बलात्कारासाठी माझ्या कपड्यांना दोष देणे, इतके सोप्पे आहे का? आपल्याकडे अजूनही मुद्दे आहेत, जसे बेरोजगारी, बलात्कार प्रकरणे, खून याकडे पाहा, असा सवाल उर्फीने केला आहे.

COMMENTS