चीनची घुसखोरी

Homeताज्या बातम्यासंपादकीय

चीनची घुसखोरी

चीन हा भारतातील शेजारी आणि आशिया खंडातील देश असला, तरी अजिबात भरवश्याचा हा देश आहे. चीन हा देश भारतविरोधी देशांसोबत नेहमीच हातमिळवणी करत, नेहमीच भारत

नगर अर्बनच्या नव्या संचालकांना दणका…रिझर्व्हने लादले निर्बंध
राजकारणाचे गुन्हेगारीकरण
बदलणे आणि बदलविणे


चीन हा भारतातील शेजारी आणि आशिया खंडातील देश असला, तरी अजिबात भरवश्याचा हा देश आहे. चीन हा देश भारतविरोधी देशांसोबत नेहमीच हातमिळवणी करत, नेहमीच भारताला कोंडीत करण्याचा प्रयत्न करतांना दिसून येत आहे. भारतासोबतच्या सीमावादाच्या दरम्यान ड्रॅगनने शेजारील देश भूतानच्या सीमेतही घुसखोरी केली आहे. चीनने भूतानच्या सीमेजवळील सुमारे 25 हजार एकर जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे. इतकंच नाही तर चीननं इथं 4 गावंही वसवली आहेत. चीनने गेल्या एका वर्षात (2020-21) या वादग्रस्त जमिनीच्या मोठ्या भागावर मनमानीपणे बांधकाम सुरू केले असले आणि आजपर्यंत 4 गावे वसवली आहेत. चीन आणि भूतानमध्ये अलीकडेच सीमा करारावर स्वाक्षरी होत असतानाच ही बाब समोर आल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. मात्र चीनची ही घुसखोरी नवी नाही. यापूर्वी देखील चिनी सैन्याने उत्र पेंगाँग तलावाजवळ गाड्यांच्या माध्यमातून 28 फेब्रुवारी, 7 मार्च आणि 12 मार्च 2018 या तीन दिवशी घुसखोरी केली. भारतीय भूभागात सहा किलोमीटरपर्यंत चिनी सैन्याने घुसखोरी केल्याचे समोर आले होते. चीनने यापूर्वीही म्हणजेच 2013 साली भारतीय हद्दीत लडाखमध्ये चीनने 19 किलोमीटपर्यंत घुसखोरी केली होती. भारतीय हद्दीच्या 19 किलोमीटपर्यंत आत देपसांगपर्यंत चीनच्या लष्कराने तंबू उभारल्यानंतर भारतीय लष्कराने तेथे गस्त घालण्यास सुरुवात केली. पूर्वी अस्तित्वात असलेल्या यंत्रणेनुसार ध्वज बैठकीत हा विषय घेण्यात आला. तसेच राजनैतिक पातळीवर याची चर्चा करून चीनला ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्यास सांगण्यात येणार आल्यामुळे हा प्रश्‍न मोडीत निघाला. तर डोकलामप्रश्‍नी देखील चीनने भारतावर वरचढ ठरवणारी भूमिका घेतली होती. मात्र भारताने डोकलामप्रश्‍नी संयमी भूमिका घेत, हा प्रश्‍न समन्वयाने सोडवला. त्यामुळे चीन-भारत या शेजारी राष्ट्रांची होणारी आगळीक थांबेल असे वाटत होते. मात्र चीनचा दुटप्पीपणा, आणि कायमच शत्रुत्व घेण्याची भूमिकामुळे चीनने पुन्हा एकदा भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. चीनला उत्तर देण्यासाठी भारताकडे नामी पर्याय आहे. मात्र त्याचा अवलंब करण्यात येत नाही. संपूर्ण देशातील म्हणजेच भारतातील बाजारपेठेत चीनी उत्पादनांच्या वस्तू मोठया प्रमाणात आहे. त्यामुळे चीनी वस्तूंना जर भारतीय बाजारपेठेत, प्रतिबंध करण्यात आला तर, कदाचित चीनची मोठी गोची होणार आहे. कारण संपूर्ण भारतात चीनी मोबाईल सह इतर वस्तूंची होणारी विक्री मोठया प्रमाणावर आहे. यातून चीनला मोठा आर्थिक महसूल प्राप्त होतो. तसेच चीनी उत्पादनांवर जर भारतात बंदी घातली, तर चीनमध्ये रोजगांरनिर्मिती थंडावेल. कारण उत्पादनांवर बंदी घातल्यामुळे उत्पादन पडून राहील, परिणामी आर्थिक व्यवस्थेला आणि रोजगारतेला मोठा फटका बसेल. तसेच पाकबरोबरच चीनची आंतरराष्ट्रीय स्तरावर कशी कोंडी करता येईल, यादृष्टीने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करता येईल. चीनने अमेरिकेला शह देण्यासाठी उत्तर कोरियाशी जवळीक साधत एक नवीन पर्याय निर्माण करण्यासाठीर प्रयत्न चालवले आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशाह हा नेहमीच अमेरिकासह तत्सम देशांना हायड्रोजन बॉम्ब सोडण्याची धमकी कायम देत असतात. त्यामुळे अनेक देशांत धडकी भरलेली आहे. असे असतांना हाच उत्तर कोरीयाचा हुकूमशाह दोन-तीन दिवसांपूर्वीच चीनमध्ये येऊन त्यांच्या अध्यक्षांसोबत संवाद साधून गेला. चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि उत्तर कोरीयाचे हुकुमशाहा, आणि पाकची सोबत यामुळे ही राष्ट्रे नवीन समीकरणे उभी करू इच्छितात. तर दुसरीकडे भारत अमिरेकासोबत जवळीक साधत, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी प्रतिमा निर्माण करू इच्छित आहे. त्यामुळे चीनची भारतात होणारी घुसखोरी हा चिंतेचा विषय असून, त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर भयंकर असे पडसाद उमटू शकतात.

COMMENTS