नवी दिल्ली ः जगामध्ये रशिया-युके्रन युद्ध सुरू असतांनाच, इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरू झालेल्या युद्धाने जगाची झोप उडवली असतांना, पुन्हा एकद
नवी दिल्ली ः जगामध्ये रशिया-युके्रन युद्ध सुरू असतांनाच, इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरू झालेल्या युद्धाने जगाची झोप उडवली असतांना, पुन्हा एकदा चीन-तैवान संघर्ष उफाळून आल्यामुळे चीन-तैवानमधील संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता व्ययक्त करण्यात येत आहे.चीन तिसरी आघाडी उघडण्याच्या तयारीत आहे. चीनने तैवानला घेरण्यासाठी 43 लष्करी विमाने आणि 7 जहाजे पाठवली आहेत.
तैवानचे म्हणणे आहे की, चीन या माध्यमातून तैवानवर दबाव आणत असून चीनच्या या कारवायांना झुकणार नाही. तैवानचे म्हणणे आहे की चीनच्या तब्बल 47 लढाऊ विमानांनी तैवानची हवाई सीमेचा भंग करत त्यात प्रवेश केला आहे. या सोबतच सात युद्धनौका देखील तैवानच्या समुद्रात पाठवण्यात आल्या आहेत. चीनने ही मर्यादा ओलांडली आहे. खरे तर, चीन एक चीन धोरणांतर्गत तैवान त्याचा अविभाज्य भाग असल्याचा दावा करतो. तर तैवान स्वतःला एक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र मानतो. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या आणि ब्रिटनच्या मोठ्या मंत्र्यांनी तैवानला भेट दिली होती, त्यामुळे चीन संतप्त झाला होता. इतकेच नाही तर अमेरिकेच्या संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी तैवानला भेट दिली तेव्हा चीनने तैवानच्या सीमेवर लढाऊ विमाने उडवली होती. सध्या तैवान चीनच्या हालचालीवर नजर ठेऊन आहे. त्यांनी चीनच्या कारवाईला उत्तर देण्यासाठी त्यांची लढाऊ विमाने देखील सज्ज ठेवली आहेत. या सोबतच सीमेवर जहाजे तैनात करण्यात आली आहे. या शिवाय चीनच्या कोणत्याही चिथावणीला प्रत्युत्तर देता यावे यासाठी क्षेपणास्त्र यंत्रणा देखील तैवान ने तैनात केली आली आहे. चीन अनेकदा तैवान सीमेवर लष्करी सराव करत तैवानवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो. अनेकवेळा चीनची लढाऊ विमानेही तैवानच्या हवाई हद्दीत घुसली आहेत. तैवानवर दबाव आणण्यासाठी चीनच्या या कुरापती सुरू असतात, असे लष्करी तज्ज्ञांचे मत आहे. अलीकडेच, चिनी लष्कराचे द्वितीय क्रमांकाचे अधिकारी जनरल झांग याओशिया म्हणाले होते की, जर कोणी तैवानला त्यांच्यापासून वेगळे करण्याचा प्रयत्न केला तर त्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील. सध्या अमेरिकेसह जगातील सर्व मोठे देश इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात व्यस्त आहेत. याशिवाय रशिया आणि युक्रेनमधील युद्धही सुरू आहे. यामुळे अमेरिका व्यस्त असल्याने टु प्रत्युत्तर देऊ शकत नसल्याने चीन तैवानवर आपला दावा मजबूत करत आहे.
COMMENTS