Homeताज्या बातम्यादेश

आशियाई स्पर्धेत अरूणाचलच्या खेळांडूना चीनने प्रवेश नाकारला

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः चीनने आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन भारतीय खेळाडूंना प्रवेश न दिल्यामुळे भारताने कठोर भूमिका घेतली आहे. चीनच्या या कृतीचा निष

मुंबई इंडियन्सची विजयी सुरूवात
सनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा झटका
भारतीय संघाने जागतिक चॅम्पियनशिपमध्ये रचला ‘सुवर्ण’ इतिहास

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः चीनने आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन भारतीय खेळाडूंना प्रवेश न दिल्यामुळे भारताने कठोर भूमिका घेतली आहे. चीनच्या या कृतीचा निषेध करत क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आपला बीजिंग दौरा रद्द केला. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ते चीनला जाणार होते.
यावेळी आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन चीनमधील हांगझोऊ येथे होत आहे. हे खेळ 23 सप्टेंबरपासून सुरू होणार असून ते 8 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहेत. अरुणाचल प्रदेशातील वुशू खेळाडूही हँगझोऊमध्ये सहभागी होणार होते, परंतु तीन वुशू खेळाडू न्यामन वांगसू, ओनिलू टेगा आणि मेपुंग लामगु यांना चीनमध्ये प्रवेश नाकारण्यात आला आहे. हे सर्व भारतीय खेळाडू अरुणाचल प्रदेशचे रहिवासी आहेत. त्यापैकी एकाला अ‍ॅक्रिडिशन मिळाले होते आणि दोघे त्याची वाट पाहत होते. मात्र बुधवारी टीम चीनला रवाना झाली तेव्हा बोर्डिंगसाठी योग्य क्लिअरन्स नसल्याने त्यांना विमानात चढू दिले गेले नाही. चीनने शुक्रवारी तीन भारतीय खेळाडूंना प्रवेश नाकारण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. या खेळाडूंकडे वैध कागदपत्रे नव्हती, असे चीनचे म्हणणे आहे. मात्र, हे खेळाडू अरुणाचल प्रदेशचे असल्याने चीनने त्यांना एंट्री देण्यास नकार दिल्याचे मानले जात आहे. कारण अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा चीनचा दावा आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग म्हणाले की, चीन आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वैध कागदपत्रांसह सर्व खेळाडूंचे स्वागत करतो. तुम्ही उल्लेख केलेला तथाकथित अरुणाचल प्रदेश चीन ओळखत नाही. दक्षिण तिबेट प्रदेश हा चीनचा भाग आहे. भारताने या घंटेचा निषेध केला आहे.

COMMENTS