अकोले : बाल आनंद मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय कौशल्यांचा विकास होतो, त्याचबरोबर व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते. स्वतः तयार केलेली वस्तू बाजारात कशी विकावी, ग्राहकांशी संवाद कसा साधावा याचे प्रत्यक्ष ज्ञान विद्यार्थ्यांना मिळते, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील देसाई यांनी केले. श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्थेच्या श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, राजूर येथे आयोजित बाल आनंद मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे सचिव व कार्यक्रमाचे उद्घाटक शांताराम काळे, रजनी देसाई, हिराबाई भागवत, अर्चना पन्हाळे, रोहिणी आरोटे, इलियाज शेख, साहिल शेख, पालक वर्ग व शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटक तथा संस्थेचे सचिव शांताराम काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून व्यावसायिक ज्ञान मिळणे अत्यंत आवश्यक आहे. गणित समजणे, शंभर रुपयांत बाजार कसा करायचा याचे ज्ञान मिळणे महत्त्वाचे आहे. स्पर्धा छोटी असो वा मोठी, विद्यार्थ्यांनी प्रत्येक स्पर्धेत सहभागी व्हावे. बहुतांश विद्यार्थी गरीब कुटुंबातून आलेले असल्याने स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले व सर्व विद्यार्थ्यांना आनंद मेळाव्याच्या शुभेच्छा दिल्या. या उपक्रमातून एकूण १४,६३० रुपयांची उलाढाल झाली. या उपक्रमाचे सर्व मान्यवर, ग्रामस्थ व पालकांनी विशेष कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक किरण भागवत यांनी केले. सूत्रसंचालन विनायक साळवे यांनी केले, तर आभार दगडू टकले यांनी मानले.

अकोले : बाल आनंद मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय कौशल्यांचा विकास होतो, त्याचबरोबर व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते. स्वतः तयार केलेली वस्तू बाजारात कशी विकावी, ग्राहकांशी संवाद कसा साधावा याचे प्रत्यक्ष ज्ञान विद्यार्थ्यांना मिळते, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील देसाई यांनी केले. श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्थेच्या श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, राजूर येथे आयोजित बाल आनंद मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी संस्थेचे सचिव व कार्यक्रमाचे उद्घाटक शांताराम काळे, रजनी देसाई, हिराबाई भागवत, अर्चना पन्हाळे, रोहिणी आरोटे, इलियाज शेख, साहिल शेख, पालक वर्ग व शिक्षकवृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटक तथा संस्थेचे सचिव शांताराम काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून व्यावसायिक ज्ञान मिळणे अत्यंत आवश्यक आहे. गणित समजणे, शंभर रुपयांत बाजार कसा करायचा याचे ज्ञान मिळणे महत्त्वाचे आहे. स्पर्धा छोटी असो वा मोठी, विद्यार्थ्यांनी प्रत्येक स्पर्धेत सहभागी व्हावे. बहुतांश विद्यार्थी गरीब कुटुंबातून आलेले असल्याने स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले व सर्व विद्यार्थ्यांना आनंद मेळाव्याच्या शुभेच्छा दिल्या. या उपक्रमातून एकूण १४,६३० रुपयांची उलाढाल झाली. या उपक्रमाचे सर्व मान्यवर, ग्रामस्थ व पालकांनी विशेष कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक किरण भागवत यांनी केले. सूत्रसंचालन विनायक साळवे यांनी केले, तर आभार दगडू टकले यांनी मानले.

COMMENTS