Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बालकांच्या कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया रखडल्या

मुंबई : जन्मजात कर्णबधीर असलेल्या दोन वर्षांपर्यंतच्या मुलांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी आर्

झाड तोडताना मध्ये आल्याच्या रागातून दोन  महिलांना कोयत्याने मारून धमकी  
जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याची गरज- संदीप शेळके 
लातूर जिल्ह्यात एक रुपया विमा हप्ता भरुन पाच लाख शेतकर्‍यांनी काढला पीक विमा!

मुंबई : जन्मजात कर्णबधीर असलेल्या दोन वर्षांपर्यंतच्या मुलांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत देण्यात येते. तथापि अनेकदा जन्मजात कर्णबधीर मुलांची माहिती उशिरा उपलब्ध होते. त्यामुळे ही वयोमर्यादा वाढवून पाच वर्षांपर्यंत करण्यासाठी आरोग्य विभाग केंद्र शासनाकडे गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. मात्र केंद्राकडून अद्यापि कोणताही प्रतिसाद मिळालेला नसल्याने दोन वर्षांवरील मुलांना या शस्त्रक्रियेसाठी शासकीय मदत देणे शक्य होत नाही. यातील गंभीर बाब म्हणजे या शस्त्रक्रियेसाठी येणार्‍या खर्चात वाढ करून देण्याच्या मागणीसाठी आरोग्य विभागाने केंद्राला अनेकदा स्मरणपत्रे पाठवली तरीही कोणतेही उत्तर अद्यापि केंद्राकडून देण्यात आले नसल्याचे आरोग्य विभागातील एका उच्चपदस्थ अधिकार्‍याने सांगितले.
गेली दोन वर्षे लहान मुलांच्या कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी वयोमर्यादा वाढवून मिळावी तसेच आर्थिक वाढ मिळावी या मागणीला केंद्राकडून वाटाण्याच्या अक्षताच मिळत आहे. संवेदी मज्जातंतू कर्णबाधिता असण्याचे प्रमाण हे साधारणपणे नवजात बालकांमध्ये 1 ते 4 टक्के असते. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गंत केल्या जाणार्‍या कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेची मर्यादा ही दोन वर्षांपर्यंतची आहे. तसेच यासाठी उपचार म्हणजे शस्त्रक्रियेसाठी शासनाकडून पाच लाख 29 हजार रुपयांची मदत करण्यात येते.

COMMENTS