Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरड्याचा मृत्यू

राहाता ः घरासमोरील अंगणात खेळत असलेल्या साडेतीन वर्ष वयाच्या चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला करून मुलाला घरापासून सहाशे फूट अंतरावर फरफटत नेले या हल्

घोडशिंग तांड्यावरील बिबट्याचा हल्ला
केडगाव उपनगरामध्ये भरदिवसा बिबट्याचा हल्ला
बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

राहाता ः घरासमोरील अंगणात खेळत असलेल्या साडेतीन वर्ष वयाच्या चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला करून मुलाला घरापासून सहाशे फूट अंतरावर फरफटत नेले या हल्ल्यात चिमूरड्या मुलाचा जागेवरच मृत्यू झाला. रक्षाबंधन सणाचे पूर्व संध्येंला या चिमुकल्या मुलाचे बाबतीत ही खळबळजनक घटना घडली या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे ही घटना राहाता तालुक्यातील चितळी गावात घडली वनविभागाचे हलगर्जीपणा या बालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप करत नागरिकांनी वनविभागा विषयी संताप व्यक्त केला आहे.
याबाबतचे वृत्त असे की चितळी ता.राहाता येथील मयूर दत्तात्रय वाघ याची वस्ती गावापासून तीन किलोमीटर अंतरावर वाकडी रोड काकडाई मंदिरा जवळ आहे.सायंकाळी साडेसहा वाजण्याचे सुमारास अंगणात खेळत असलेला प्रथमेश मयूर वाघ साडेतीन वर्ष या बालकांवर घरा शेजारील डाळींबाच्या बागेत दबा धरून बसलेल्या बिबट्या ने झेप घेत क्षणार्धात धूम ठोकली.बाहेर असलेल्या आजी ने आरडाओरडा केल्यानंतर घरातील सर्व व्यक्ती बिबट्याच्या दिशेने धावल्या. मात्र बिबटया मिळून न आल्याने घरच्यांनी डाळींब व मका इतरत्र शोध घेतल्या नंतर घरापासून सहाशे फूट असलेल्या गिनीं गवतात रक्त भाबांळ अवस्थेत हा चिमुरडा मिळून आला.त्यांच्या मानेला मोठ्या प्रमाणात जखम झालेली होती जागेवरच गतप्राण झाल्याचे प्रथम दर्शनी नागरिकांनी या वेळी सांगितले त्याला तातडीने पुढील उपचारार्थ श्रीरामपूर येथील कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र डॉक्टरांनी तो मृत घोषित केले.

COMMENTS