मुख्यमंत्र्यांचा अवैदिक संघर्ष !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

मुख्यमंत्र्यांचा अवैदिक संघर्ष !

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गर्दीचा महापूर असलेली सभा अवघ्या महाराष्ट्राने पाहिली. सेनेचा मेळावा असो अथवा सभा गर्दीची तशी वाणवा जाणवत नसतेच! सध

शेती महामंडळाच्या स्थावर व्यवस्थापक पदावर आता तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेमणुकीस सुरुवात
सक्षमांनी किमान दोघांचे मार्गदर्शकत्व स्वीकारावे – उपमुख्यमंत्री फडणवीस
समीर वानखेडेंच्या विरोधात गुन्हा दाखल| LOKNews24

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गर्दीचा महापूर असलेली सभा अवघ्या महाराष्ट्राने पाहिली. सेनेचा मेळावा असो अथवा सभा गर्दीची तशी वाणवा जाणवत नसतेच! सध्याच्या काळात राजकारण देखील काॅर्पोरेट झाल्याने लोक उस्फूर्तपणे येतात की आणले जातात, हा एक संशोधनाचा विषय आहे. कारण सर्वच पक्ष आता सभेचा उच्चांक मोडण्याच्या स्पर्धेत आले आहेत. इव्हेंट मॅनेजमेंट ही संकल्पना यासाठी महत्वपूर्ण ठरली आहे. असो. या सभेच्या अनुषंगाने चर्चा उपस्थिती पासून व्हायला हवी होती; परंतु, हल्ली असे काही करायला माध्यमे धजत नाहीत. या सभेत अंदाजाप्रमाणे उध्दव ठाकरे यांनी विरोधी पक्षांचा समाचार घेतला. त्यावर टिकाटिपणी होत आहेच. परंतु, भाषणाचा एकूणच सार हिंदूत्वाच्या स्पर्धेत अधिक पुढे कोण याभोवतीच फिरला. हिंदूत्वाच्या मुद्यावर बोलताना ‘ह्रदयात राम आणि हाताला काम,’ हे आमचे हिंदुत्व असल्याचे सांगत उध्दव ठाकरे यांनी ‘ आमचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे नाही, तर त्या पुढचे रोजगाराचा विचार करणारे आहे, हे देखील तेवढेच ठसवले! मात्र, एकंदरीत राज्यातील सरकार असो की विरोधी पक्ष यांनी सर्व चर्चा धर्म आणि हिंदूत्वाभोवती आणून लोकशाहीच्या संकोचाला चालना दिली आहे, असे जाणवत राहते. या सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देखील मुख्यमंत्र्यांनी टिका केली; परंतु, अशा टिकेने त्यांना फारसा फरक पडत नाही! कारण एकूणच सांस्कृतिक वास्तव खोटेपणाकडे दामटून नेण्याची हातोटी संघाकडे आहे. संयुक्त महाराष्ट्र समितीत संघाने फूट पाडली हा आरोप, संघ संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अग्रेसर होता, असे प्रमाणपत्र देण्यासारखे आहे. तसे पाहिले तर लोकांचा सहभाग असलेल्या चळवळीत संघाला त्याकाळी कोणीही जवळ करित नव्हते.‌ अशा प्रकारची संधी संघाला देशात सर्वप्रथम दिली ती जयप्रकाश नारायण यांनी. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भाषणातून राज्य सरकारची गुणात्मकता केंद्र सरकार पेक्षा कशी वेगळी आहे, हे लोकांना ऐकायची इच्छा होती. त्या इच्छेची पूर्तता झाली किंवा नाही हे ठरविणे ज्याच्या त्याच्या विचारांचा भाग आहे. अर्थात मुख्यमंत्री ठाकरे यांनी जे भाषण केले त्यातील राजकीय भाष्य सोडले तर सांस्कृतिक पातळीवर त्यांनी बऱ्यापैकी आवाहनात्मक भाष्य केले. सांस्कृतिक पातळीवर वर्तमान राज्य सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात आता संघर्ष सुरू झाला आहे. या संघर्षाची सुरुवात निश्चितपणे शिवसेनेने केली, जी एक स्वागतार्ह बाब आहे. ‘आमचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे नाही,’ या वाक्याने ती सुरुवात झाली. थेट सत्ताधारी असणाऱ्या पक्ष किंवा नेतृत्वाकडून देण्यात आलेले आव्हान म्हणजे वैदिक विरूद्ध अवैदिक अशा संघर्षाला निमंत्रण देणारे आहे. हा संघर्ष आता मिटकरी ते केतकी अशा वळणावर आला आहे. हा संघर्ष वैदिक विरूद्ध अवैदिक असा अथवा महात्मा फुले यांच्या विचारांनुसार ब्राह्मण – ब्राह्मणेतर असा किंवा अलिकडेच प्राच्यविद्या पंडित शरद पाटील यांच्या तात्विक संकल्पनेनुसार ब्राह्मणी – अब्राह्मणी असा आहे. उध्दव ठाकरे यांनी आपल्या भाषणात अवैदिक अथवा ब्राह्मणेतर अथवा अब्राह्मणी प्रवाहाचे नेतृत्व केल्याचे त्यांच्या भाषणातून स्पष्टपणे जाणवते. ही वैचारिक स्पष्टता जसजशी स्पष्ट होत चालली आहे, तसतसा सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यातील राजकीय संघर्ष टोकदार होताना दिसतोय. सामाजिक पातळीवर अशा प्रकारचे भाष्य केले जाते तेव्हा संघ त्याची फार दखल घेत नाही. परंतु, सत्तेच्या पातळीवर जर अशी वक्तव्ये केली तर मग संघ वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून यात आक्रमक भूमिका घेतो. कारण सरकारची लाइन अशी आली तर संघाचा सांस्कृतिक पराभव त्यांना त्यात दिसतो. त्यामुळे मिटकरी यांची सामाजिक प्रबोधनाच्या पातळीवरील अनेक भाषणे आक्रमक आहेत; परंतु, त्याची संघाने कधी दखल घेतली नाही. पण, आमदार म्हणून ते एखादे वाक्य बोलतात तेव्हा त्याविरोधात ते आक्रमक होतात. तेच शरद पवार यांनी ‘पाथरवट’ कविता ऐकवली आणि केतकी पुढे आली. त्यामुळे, एक गोष्ट निश्चित आशादायी दिसते की, सामाजिक पातळीवर एक संघर्ष सत्तापक्षाकडून पुढे जातोय. त्याचे प्रतिनिधित्व कालच्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले!

COMMENTS