Homeताज्या बातम्यादेश

मुख्यमंत्री नितीश यांची प्रकृती खालावली

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना सर्दी आणि सौम्य ताप आहे. सध्या ते सीएम हाऊसमध्ये विश्रांती घेत आह

माझी वसुंधरा अभियान; पुणे विभाग राज्यात प्रथम ; विभागीय आयुक्त सौरभ राव यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव
दादर येथे वसतिगृहात विद्यार्थाची आत्महत्या
उमेदवारी अर्ज दाखल करताना घ्यावयाची दक्षता व आवश्यक तरतुदी

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना सर्दी आणि सौम्य ताप आहे. सध्या ते सीएम हाऊसमध्ये विश्रांती घेत आहेत. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांचे शुक्रवारचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने नितीश कुमार यांनी कार्यक्रम पुढे ढकलला आहे. मुख्यमंत्री पाटणा येथे आयोजित बिहार बिझनेस कनेक्ट कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. त्यांच्यासमोर सामंजस्य करार होणार असल्याची चर्चा होती, मात्र सध्या मुख्यमंत्री या कार्यक्रमाला येणार नाहीत.

COMMENTS