मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची सदिच्छा भेट

Homeताज्या बातम्यादेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची सदिच्छा भेट

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांनी आज माजी खासदार छत्रपती संभाजीराजे(Chhatrapati Sambhaji Raje) यांची सदिच्छा भेट घेतली. मु

फडणवीसांसह अनेकांना अडकवण्याचा ’मविआ’ कट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला परिवहन विभागाचा आढावा
शिवसेना कुणाची होणार लवकरच फैसला निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांनी आज माजी खासदार छत्रपती संभाजीराजे(Chhatrapati Sambhaji Raje) यांची सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्री श्री. शिंदे दोन दिवसांच्या दिल्ली भेटीवर असून त्यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या दिल्लीतील निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा व छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावरील पुस्तक मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना भेट दिले. यावेळी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार सर्वश्री राहुल शेवाळे, हेमंत पाटील आणि माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ यावेळी उपस्थित होते.

COMMENTS