Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विदर्भाच्या रणजी संघाचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

मुंबई, दि. २६ : रणजी ट्रॉफी ही देशातील सर्वात प्रतिष्ठेची आणि मोठी क्रिकेट स्पर्धा मानली जाते. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, जिथे मुंब

नगरच्या नयना खेडकर हिने चीनमध्ये कुंग फू खेळात पटकाविले रौप्य पदक
पाणी पुरवठ्याबाबत प्रशासनाकडून कराडकरांसह लोकप्रतिनिधींची दिशाभूल
क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारचा भीषण अपघात
Vidarbha advances to Ranji Trophy final | विदर्भाची रणजी करंडक अंतिम फेरीत  धडक: मुंबईचा 80 धावांनी पराभव; हर्ष दुबेची 5 विकेट, शार्दूलचे अर्धशतक -  Nagpur News | Divya Marathi

मुंबई, दि. २६ : रणजी ट्रॉफी ही देशातील सर्वात प्रतिष्ठेची आणि मोठी क्रिकेट स्पर्धा मानली जाते. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, जिथे मुंबई, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र अशा तीन वेगवेगळ्या संघांचा समावेश असून यंदाच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत विदर्भाने शानदार कामगिरी करत जेतेपद पटकावले आहे. या ऐतिहासिक विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ संघाचे विधानपरिषदेत मनःपूर्वक अभिनंदन केले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, क्रिकेट विश्वचषक जिंकणारा आपला संघ असो, किंवा देशासाठी पदके जिंकणारे खेळाडू असोत त्यांचा उचित सन्मान करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. खेळाडूंना योग्य सन्मान व पुरस्कार देण्याचे काम राज्य शासन करेल. राज्य शासनाकडून खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अधिकाधिक सहकार्य केले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी या निवेदनाद्वारे स्पष्ट केले.

COMMENTS