Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्रपतींनी हाती मशाल घ्यावी ः संजय राऊत

मुंबई ः लोकसभा निवडणुकीत सर्वंच राजकीय पक्षांकडून रणशिंग फुंकण्यात आले असून, उमेदवार देखील जवळपास फायनल होत आले आहे. मात्र महाविकास आघाडीचा जागा-

Sanjay Raut : निवडणुकीतील पराभवाच्या भीतीनेच मोदी सरकारने काळे कायदे मागे घेतले | LokNews24
राज्यात सत्तांतर झाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
राज्यात मध्यावधी निवडणुकांची तयारी

मुंबई ः लोकसभा निवडणुकीत सर्वंच राजकीय पक्षांकडून रणशिंग फुंकण्यात आले असून, उमेदवार देखील जवळपास फायनल होत आले आहे. मात्र महाविकास आघाडीचा जागा-वाटपांचा घोळ अजूनही मिटलेला नाही. त्यातच  ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूरच्या जागेवर दावा केला आहे. तसेच छत्रपतींनी हाती मशाल घेतली तर महाराष्ट्र उजळून निघेल असे विधान केले आहे. त्यामुळे छत्रपतींनी कोल्हापूरच्या जागेवर ठाकरे गटाकडून लढावे अशी इच्छा व्यक्त केली आहे.
याबाबत बोलतांना राऊत म्हणाले, ’’कोल्हापूरची जागा ही शिवसेनेने जिंकलेली जागा आहे आणि जिंकलेल्या जागांवर चर्चा करायची नाही हे जागा वाटपातील सूत्र आहे. शाहू महाराज यांचा विषय आम्ही राज्यसभेसाठी घेतला होता. मात्र लोकसभेच्या जागेसाठी शाहू महाराज यांच्या लढण्यासंदर्भात चर्चा झालेली नाही. ही जागा सोडू नये यासाठी आमच्यावर दबाव आहे’’ असेही राऊत म्हणाले. पुढे राऊत म्हणाले, ही शिवसेनेची जागा असल्याने सगळ्यांनी मिळून शाहू छत्रपतींशी बोलण्याचं ठरवले आहे, मी देखील त्यांच्याशी भेटून चर्चा करेन. छत्रपती शाहू यांना आम्ही मानतो. त्यांचा प्रचंड मान आहे. त्यामुळे आता त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. ती जागा शिवसेनेची त्यामुळे ते मशाल चिन्हावर लढण्यास तयार आहेत का हे पाहावे लागेल असे राऊत म्हणाले. दरम्यान, महाविकास आघाडीत काही भांडण नाही. कुठलेही मतभेद नाहीत. प्रकाश आंबेडकरांनाही हे माहिती आहे. जागावाटपावर चर्चा होते. एखाद्या जागेवर आग्रह त्यांचाही असतो, आपलाही असतो. कार्यकर्त्यांचा दबाव असतो. प्रकाश आंबेडकरांकडून यादी आली. ज्या जागेवर काम केले, त्यावर चर्चा होणार आहे. प्रकाश आंबेडकर, शरद पवार, उद्धव ठाकरे उद्या एकत्र बसून चर्चा करतील. जे देशाचे शत्रू आहेत, संविधानाच्या लढाईविरोधात प्रकाश आंबेडकर भूमिका घेणार नाहीत असा दावाही राऊतांनी केला.

COMMENTS