Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज चौकाला अवैद्य प्रवासी वाहतुकीचा वेढा

बीड प्रतिनिधी - छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात नगर रोड मार्गावरून अवैद्य वाहतूक प्रवासी वाहनांची संख्या वाढली असून छत्रपती शिवाजी महाराज चौक

राज्यात आगामी चार दिवस थंडीचे
थोरातांचा राजीनामा मान्य करण्याचा प्रश्‍नच नाही
यवतमाळ ‘ती’ बस नाल्यातून बाहेर, चालकासह चौघांचा मृत्यू

बीड प्रतिनिधी – छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात नगर रोड मार्गावरून अवैद्य वाहतूक प्रवासी वाहनांची संख्या वाढली असून छत्रपती शिवाजी महाराज चौकातच हे वाहन चालक रस्त्यावर उभे राहून वाहतुकीस अडथळा निर्माण करत असून रस्त्यावरून येणार्‍या जाणार्‍या नागरिकांनाही हाताला धरून कुठे जायचे आहे म्हणून जबरदस्ती करत असल्याचे चित्र सध्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाहावयास मिळत आहे याकडे वाहतूक शाखेच्या पोलिसांनी तात्काळ लक्ष देण्याचे मागणी होत आहे.
नगर रोड मार्गे प्रवासी वाहतूक करणारे अनेक अवैध वाहन चालक छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभे राहतात यामुळे अनेक वेळा अपघातही होतात, रस्त्यावरच वाहने उभे राहत असल्याने रस्त्यावरून पायी चालणार्‍या नागरिकांनाही याचा त्रास होत आहे विशेष म्हणजे अवैध  प्रवासी वाहतूक करणारे नागरिकांनाही जबरदस्तीने वाहनात बसवत आहेत अनेक वेळा यामुळे वादही निर्माण होत असतात वाहतूक शाखेतील कर्मचारी नेहमीच या चौकात वाहतूक सुरळीत करण्यासाठी कर्तव्य बजावत असतात मात्र या अवैधपणे वाहतूक करणार्‍या वाहन चालकांच्या मालकावर वाहतूक पोलिसांची वक्रदृष्टी कधी फिरणार? दररोज सकाळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक उभी राहतात यामुळे सर्वसामान्यांना त्रास होत आहे याची दखल तात्काळ वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी घेऊन आधारित अडथळा निर्माण करणार्‍या वाहनचालकावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

COMMENTS